महिका शर्मा आणि हार्दिक पांड्या(फोटो-सोशल मीडिया)
Hardik Pandya’s statement on Mahika Sharma: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका खेळी जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ९ डिसेंबर रोजी कटकमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १०१ धावांनी पराभव केला. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने केलेले वादळी खेळीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. पंड्या मैदान असो की मैदानाबाहेर, तो नेहमी चर्चेत असतो. आता तो त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने पहिल्यांदाच त्याची गर्लफ्रेंड महिका शर्माबाबत उघड भाष्य केले आहे. हार्दिक पंड्या त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल नेमकं काय म्हणाला? हे आपण जाणून घेऊया.
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने त्याच्या घटस्फोटानंतर सोशल मिडिया महिका शर्मासोबतचा फोटो शेअर करुन दोघांच्या नात्याचा कबुली दिली होती. महिका शर्मा देखील बऱ्याचदा सोशल मिडियावर पोटो शेअर केले आहेत. आता पहिल्यांदा हार्दिकने त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल सार्वजनिकरित्या महिका शर्माबद्दल भाष्य केले आहे. तो म्हणला की, “मला विशेष करून माझ्या पार्टनरचा उल्लेख करावा लागेल की, जेव्हापासून ती(महिका शर्मा) माझ्या आयुष्यात आली. तेव्हापासून ती चांगली राहिली आहे. ती जेव्हापासून आली तेव्हापासून सर्व गोष्टी कमाल होत आल्या आहेत.”
माहिका शर्माचा जन्म दिल्लीमध्ये झाला आहे. ती २४ वर्षाची असून माहिका एक अभिनेत्री, मॉडेल आणि फिटनेस कंटेंट क्रिएटर देखील आहे. ती सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिने दिल्लीत शिक्षण घेतले आणि अर्थशास्त्र आणि वित्त या विषयात पदवी प्राप्त केली आहे. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहतावर्ग असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते. हार्दिकसोबत नाव जोडल्यापासून ती जास्त चर्चेचा विषय बनत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी २० सामन्यात टॉस गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने ६ गडी गमावून १७५ धावा काढल्या. स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने २८ चेंडूत शानदार नाबाद ५९ धावांची खेळी केली. हार्दिक पंड्याने या सामन्यात एक विकेट देखील घेतली धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ७४ धावाच करता आल्या.परिणामी भारताने हा सामना १०१ धावांनी जिंकला आणि पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.






