
Harmanpreet Kaur resign
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मंगळवारी सर्व प्रकारच्या फॉरमॅटमधून कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आढावा बैठकीच्या अवघ्या एका दिवसानंतर हरमनप्रीतने हा निर्णय घेतल्याने क्रिकेट जगतात मोठा खळबळ उडाली आहे.Harmanpreet Kaur Resignation: हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा
हरमनप्रीत कौर ही भारतीय महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानली जाते. तिच्याच नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने गेल्या वर्षी पहिल्यांदाच ऐतिहासिक ‘महिला वनडे वर्ल्ड कप’चे विजेतेपद पटकावून इतिहास रचला होता. तिने राजीनामा दिल्यानंतर आता भारतीय संघाचा नवा कर्णधार कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये उपकर्णधार स्मृती मंधानाचे नाव सर्वात आघाडीवर आहे.
सोमवारी गुवाहाटी येथे बीसीसीआयचीएक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीला प्रशिक्षक अमोल मजूमदार यांच्यासोबत उपकर्णधार स्मृती मंधाना देखील उपस्थित होती. स्मृती मानधना प्रदीर्घ काळापासून भारतीय संघाकडून खेळत आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये तिने आरसीबीचे नेतृत्व सांभाळले होते. तर भारतीय संघाची उपकर्णधार म्हणून देखील जबाबदारी पार पाडत आहे. उपकर्णधार स्मृती मंधाना हिचे नाव या शर्यतीत सर्वात पुढे असून तीच भारतीय संघाची नवी कर्णधार बनण्याची दाट शक्यता आहे.
स्मृती मंधानाचे करियर
हरमनप्रीत कौरने कप्तानी सोडल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी स्मृती मानधना हिचे नाव आघाडीवर आहे. स्मृतीने १०० हून अधिक एकदिवसीय सामन्यांमध्ये ४,००० हून अधिक धावा केल्या आहेत. यात ८ पेक्षा जास्त शतके आणि ३० हून अधिक अर्धशतकांचा समावेश आहे.