Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CWG 2026: भारताची दुहेरी कमाल! शॉटपुटमध्ये Soman Rana ने जिंकले ‘गोल्ड’; शुभम जुयालच्या गळ्यात सिल्व्हर

Para-athletics soman wins gold juyal bags silver CWG 2026: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पॅरा ॲथलेटिक्समध्ये दुहेरी यश मिळवले आहे. भारताच्या सोमन राणाने सुवर्णपदक, तर शुभम जुयालने रौप्यपदक पटकावले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 01, 2026 | 07:04 PM
CWG 2026: भारताची दुहेरी कमाल! शॉटपुटमध्ये Soman Rana ने जिंकले ‘गोल्ड’; शुभम जुयालच्या गळ्यात सिल्व्हर
Follow Us
Follow Us:
  • पॅरा ॲथलेटिक्समध्ये भारताची दमदार कामगिरी
  • सोमन राणाने जिंकले गोल्ड, शुभम जुयालला सिल्व्हर
  • भारताने जिंकली एकूण ३० पदके

राष्ट्रकुल खेळाच्या ( Commonwealth games 2026) च्या १० व्या दिवशी भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी सुरुच आहे. भारताने बॉक्सिंगनंतर पॅरा-ॲथलेटिक्समध्ये शॉटपुटमध्ये तिसरे सुवर्णपदक जिंकले. पॅरा-ॲथलेटिक्समधील पुरुषांच्या शॉटपुट एफ५७ प्रकारात दोन भारतीय खेळाडूंनी पदके पटकावली. सोमन राणाने सुवर्णपदक जिंकले, तर शुभम जुयालला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यासह, भारताने २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये आठ सुवर्णपदकांसह एकूण ३० पदके मिळवली आहेत.

भारताच्या गोल्डन गर्लचा बॉक्सिंगमध्ये तुफान पंच! प्रीती पवारने CWG 2026 मध्ये जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक

सोमन राणाने जिंकले सुवर्णपदक, तर शुभमच्या गळ्यात सिल्व्हर

पॅरा ॲथलेटिक्सच्या पुरुषांच्या शॉटपुट एफ५७ प्रकारात दोन स्टार भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण आणि रौप्य दोन्ही पदके पटकावत दुहेरी यश मिळवले. सोमन राणाने आपल्या पहिल्याच प्रयत्नात १३.३८ मीटरचा टप्पा गाठून अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर त्याने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात कामगिरीत सुधारणा करत १३.४० मीटरचा टप्पा गाठून सुवर्णपदक मिळवले. शुभम जुयालची सुरुवात चांगली झाली नाही, पण त्याने हार मानली नाही. आपल्या सहाव्या आणि अंतिम प्रयत्नात त्याने १३.२८ मीटरचा टप्पा पार करून रौप्यपदक मिळवले. तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या कॅमेरूनच्या सेड्रिक इद्रिस लेकेझो अझमजीने १२.५७ मीटरचा टप्पा गाठला.

भारतीय सैन्यात सेवा बजावलेला सोमन पूर्वी बॉक्सर होता, पण २००६ मध्ये भूसुरुंगाच्या अपघातानंतर त्याने पॅरा-ॲथलेटिक्सचा स्वीकार केला. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्यानंतर, त्याने आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून देशाला गौरव मिळवून दिला आहे.

सुवर्णपदक जिंकणारा सोमन पहिला भारतीय

F57 प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी सोमन हा पहिली भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच F57 प्रकारात एकाच वेळी दोन पदके जिंकली आहेत.एकाच स्पर्धेत दोन भारतीयांनी पदके जिंकण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी, महिलांच्या शॉटपुट F57 (शर्मिला ढाका – सुवर्ण, शिल्पा शैला – कांस्य), पुरुषांच्या १०० मीटर T47 शर्यत (दिलीप गवीत – सुवर्ण, मोहम्मद बासिल – रौप्य), पुरुषांच्या भालाफेक (नीरज चोप्रा – रौप्य, यशवीर सिंग – कांस्य) आणि पुरुषांच्या तिहेरी उडी (प्रवीण चित्रवेल – रौप्य, सेल्वा प्रभू – कांस्य) या स्पर्धांमध्ये दोन भारतीय खेळाडूंनी एकाच वेळी पदके जिंकली आहेत.

भारताने जिंकली एकूण ३० पदके

आतापर्यंत भारताने २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ८ सुवर्ण, १५ रौप्य आणि ७ कांस्य पदकांसह एकूण ३० पदके जिंकली आहेत. भारतीय खेळाडूंनी नेमबाजी, कुस्ती आणि हॉकी या खेळांमध्ये भाग न घेता ही कामगिरी केली.

CWC 2026: फास्ट बॉलर बनायचं स्वप्न, पण नशिबाने खेळ बदलला; डेकॅथलॉनमध्ये भारताला कांस्यपदक जिंकवणारा Tejaswin Shankar कोण?

Web Title: Soman rana gold shubham juyal silver para shot put cwg 2026 glasgow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 07:04 PM

Topics:  

  • Athletics
  • commonwealth games 2026
  • Indian Para Athletics

संबंधित बातम्या

अश्रूंत न्हालेले ‘रौप्य’पदक! ग्लास्गोतील ‘तो’ थरार; CWG 2026 मध्ये Jadumanin Singh ने लावली जिवाची बाजी
1

अश्रूंत न्हालेले ‘रौप्य’पदक! ग्लास्गोतील ‘तो’ थरार; CWG 2026 मध्ये Jadumanin Singh ने लावली जिवाची बाजी

भारताच्या गोल्डन गर्लचा बॉक्सिंगमध्ये तुफान पंच! प्रीती पवारने CWG 2026 मध्ये जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक
2

भारताच्या गोल्डन गर्लचा बॉक्सिंगमध्ये तुफान पंच! प्रीती पवारने CWG 2026 मध्ये जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक

Commonwealth Games 2026: जॅस्मिन लांबोरियाचा बॉक्सिंगमध्ये धुमाकूळ! भारताला दिवसातून दुसरे गोल्ड पदक, 5-0 ने वॉल्शला हरवलं
3

Commonwealth Games 2026: जॅस्मिन लांबोरियाचा बॉक्सिंगमध्ये धुमाकूळ! भारताला दिवसातून दुसरे गोल्ड पदक, 5-0 ने वॉल्शला हरवलं

वादळी कामगिरी! Commonwealth मध्ये मेडल अन् ‘या’ खेळाडूंचा MP सरकार करणार सन्मान; 25 लाख अन् सरकारी…
4

वादळी कामगिरी! Commonwealth मध्ये मेडल अन् ‘या’ खेळाडूंचा MP सरकार करणार सन्मान; 25 लाख अन् सरकारी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.