२१ डिसेंबर १९९८ रोजी दिल्लीत जन्मलेल्या तेजस्विन शंकरने लहानपणापासूनच क्रिकेटपटू बनण्याचे होते. त्याला वेगवान गोलंदाज व्हायचे होते. त्याचे वडील हरिशंकर बीसीसीआयचे वकील होते आणि घरात क्रिकेटचे वातावरण होते, पण आयुष्याने त्याला अगदी लहान वयातच एका कठीण परीक्षेला सामोरे जाण्यास भाग पाडले. तेसजस्विनच्या वडिलांचे ब्लड कॅन्सरमुळे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्याचा मार्ग अधिकाधिक खडतर होत गेला. दिल्लीतील सरदार पटेल विद्यालयात शिकत असताना, शारीरिक शिक्षण शिक्षकांनी त्याला ॲथलेटिक्स निवडण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. तेजस्विनने, वयाच्या १६ व्या वर्षी, २.१८ मीटरची उंच उडी मारून ( High Jump) हरी शंकर रॉय यांचा १२ वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. यामुळे त्याला अमेरिकेतील कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये क्रीडा शिष्यवृत्ती मिळवणे शक्य झाले. २०१८ मध्ये, तेजस्विनने २.२९ मीटरचा नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला, जो आजही त्याच्या नावावर आहे.
History created in the Men’s Decathlon! 🥉🇮🇳 Congratulations to TOPS athlete Tejaswin Shankar for winning Bronze and securing India’s first-ever CWG medal in the Decathlon. The entire country is proud of you.#CWG2026 #Cheer4Bharat pic.twitter.com/rgtIpWG1Jy — Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) July 31, 2026
एवढे यश मिळवूनही तेजस्विन थांबला नाही. उंच उडीसोबतच त्याने डेकॅथलॉनमध्येही भाग घेण्याचे ठरवले, जो जगातील सर्वात कठीण मैदानी खेळांपैकी एक मानला जातो. डेकॅथलॉनमध्ये खेळाडूला दोन दिवसांत १० वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा लागतो. यात वेग, ताकद, सहनशक्ती आणि टेकनिक या चौघांचीही परीक्षा होते. तेजस्विनने २०२३ च्या आशियाई ॲथलेटिक्समध्ये कांस्यपदक, आशियाई खेळांमध्ये ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले.
तेजस्विनने बर्मिंगहॅम येथे झालेल्या २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २.२२ मीटर उंच उडी मारून कांस्य पदक जिंकले आणि या स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. आता २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत, तेजस्विन शंकरने डेकॅथलॉनमध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे.
CWG 2026: अवघ्या 1 किलोने सुवर्ण हुकले! Lovepreet Singh ने विक्रमी वजन उचलत जिंकले रौप्यपदक






