Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking Neeraj Yadav Death: क्रीडाविश्वात खळबळ! एशियन पॅरा गेम्समध्ये भारताला 3 गोल्ड जिंकून देणाऱ्या ‘या’ दिग्गज खेळाडूचा मृत्यू

Asian Para Gold Medalist Neeraj Yadav Committed Suicide: जगभरात भारताला गौरव मिळवून देणाऱ्या आणि तीन वेळा सुवर्णपदर जिंकणाऱ्या पॅरा-ॲथलीट नीरज यादव यांचे दुःखद निधन झाले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 28, 2026 | 01:58 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • क्रीडाविश्वातून धक्कादायक बातमी
  • नीरज यादव यांचे निधन
  • एशियन पॅरा गेम्समध्ये जिंकले ३ गोल्ड
Neeraj Yadav: भारतीय क्रीडाविश्वातून एक दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. आशियाई पॅरा गेम्समध्ये (Asian Para Games) तीन सुवर्णपदके जिंकणारा भारतीय पॅरा-ॲथलीट नीरज यादव यांचा मृत्यt झाला आहे. वृत्तानुसार, ४२ वर्षीय पॅरा-ॲथलीटने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यांनी मंगळवारी रात्री आपल्या अपार्टमेंटमध्ये आपले जीवन संपवले. सध्या, दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि परिस्थिती अद्याप समोर आलेली नाही. (Asian Para Gold Medalist Neeraj Yadav Committed Suicide)

IPL 2027 Auction: खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार! फ्रँचायझींची तयारी सुरू; मिनी ऑक्शनची तारीख समोर

नीरज यादवने केली आत्महत्या

टीओआयच्या वृत्तानुसार, ४२ वर्षीय पॅरा-ॲथलीट आणि भालाफेकपटू नीरज यादवने आत्महत्या केली आहे. विष प्राशन केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे सहकारी पॅरालिम्पिक चॅम्पियन सुमित अंतिल आणि विपिन कसाना हे देखील रुग्णालयात उपस्थित होते. नीरजच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. भारताचे मुख्य पॅरा-ॲथलीट प्रशिक्षक, एस. सत्यनारायण यांनी टीओआयला नीरजच्या आत्महत्येबद्दल माहिती दिली.

सत्यनारायण म्हणाले की, ‘हो, नीरज यादवने आत्महत्या केली आहे. मला आतापर्यंत एवढीच माहिती आहे. मला सांगण्यात आले आहे की, त्याने काल रात्री त्याच्या अपार्टमेंटमध्ये विष प्राशन केले. ही खूप दुःखद आणि अत्यंत दुर्दैवी बातमी आहे.’

एस. सत्यनारायण पुढे म्हणाले की, ‘तो आशियाई पॅरा गेम्समध्ये सहभागी होण्याचा विचार करत होता. या स्पर्धेत पदक जिंकल्यास भरीव सरकारी बक्षिसे मिळतात आणि नोकरी मिळण्याची संधीही असते. मात्र, डोपिंग टेस्टमधील निलंबन मागे न घेतल्याने तो स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. याचा त्याच्यावर गंभीर परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. परंतु, आम्ही सध्या या प्रकरणावर भाष्य करू शकत नाही.’

नीरज डोपिंग टेस्टमध्ये मिळालेल्या निलंबनामुळे या महिन्याच्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सहभागी होऊ शकले नव्हते. सध्या, डोपिंग बंदी आणि आशियाई पॅरा गेम्समध्ये सहभागी होऊ न शकणे या गोष्टी त्याच्या मानसिक स्थितीशी जोडल्या जात आहेत, परंतु या परिस्थितीचा आणि त्याच्या मृत्यूचा थेट संबंध अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेला नाही.

नीरज यादवचा प्रवास कसा होता?

उत्तर प्रदेशचे नीरज यादव हे भारतातील सर्वात यशस्वी पॅरा-ॲथलीटपैकी एक होते. वयाच्या ७ व्या वर्षी त्यांना पोलिओमुळे पक्षाघात झाल्याचे निदान झाले. असे असूनही, त्यांनी खेळाची आवड जोपासली. त्यांनी २००५ ते २०१२ पर्यंत व्हीलचेअर टेनिसमध्ये भाग घेतला. त्यानंतर ते पॅरा-ॲथलेटिक्सकडे वळले. २०१५ मध्ये, त्यांनी राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत गोळाफेक, भालाफेक आणि थाळीफेक या स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली. २०१८ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये त्यांनी पुरुषांच्या F55 भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. २०२३ मध्ये, त्यांनी भालाफेक आणि थाळीफेक या स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली. पॅरा-ॲथलेटिक्समधील भारताच्या यशातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Saransh Jain ची घातक गोलंदाजी! फिरकीच्या जाळ्यात अडकले बिहारचे फलंदाज! ७ विकेट्स घेत संघाला ९९ धावांत गुंडाळलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: नीरज यादव कोण होते?

    Ans: नीरज यादव हे भारतीय पॅरा-ॲथलीट आणि भालाफेकपटू होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतासाठी पॅरा-ॲथलेटिक्समध्ये शानदार कामगिरी केली होती.

  • Que: नीरज यादव यांनी एशियन पॅरा गेम्समध्ये किती सुवर्णपदके जिंकली होती?

    Ans: नीरज यादव यांनी २०१८ आणि २०२३ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भालाफेक आणि थाळीफेकसह विविध स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली होती.

  • Que: नीरज यादव यांचा मृत्यू कसा झाला?

    Ans: वृत्तांनुसार, नीरज यादव यांनी विष प्राशन केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले.

Web Title: Asian para games gold medalist neeraj yadav death committed suicide pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • Asian Para Games 2026
  • commit suicide
  • Indian Para Athletics
  • javelin throw

संबंधित बातम्या

Asian Para Games: भारताची मान अभिमानाने उंचावली! Simran ने रचला ‘हा’ इतिहास, होणार जंगी स्वागत
1

Asian Para Games: भारताची मान अभिमानाने उंचावली! Simran ने रचला ‘हा’ इतिहास, होणार जंगी स्वागत

Asian Para Games : सुमित अंतिलचा भालाफेकीत ‘गोल्डन’ थ्रो! भारताची पदकांची विक्रमी शंभरी पार
2

Asian Para Games : सुमित अंतिलचा भालाफेकीत ‘गोल्डन’ थ्रो! भारताची पदकांची विक्रमी शंभरी पार

Asian Para Games : नितेश-थुलसिमथीची रौप्यपदकाला गवसणी; पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताची दमदार कामगिरी!
3

Asian Para Games : नितेश-थुलसिमथीची रौप्यपदकाला गवसणी; पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताची दमदार कामगिरी!

Asian Para Games 2026: दीड वर्षाच्या वयात सोडली पायांनी साथ, हरविंदरच्या ध्येयाने रचला इतिहास; सुवर्णपदकाची कमाई
4

Asian Para Games 2026: दीड वर्षाच्या वयात सोडली पायांनी साथ, हरविंदरच्या ध्येयाने रचला इतिहास; सुवर्णपदकाची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.