
मिशेल स्टार्कने घेतल्या 6 विकेट्स
ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या सिरिजमधील तिसरा आणि अंतिम सामना सध्या सुरू आहे. यामध्ये आफ्रिकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांनी शानदार सुरुवात केली. मात्र ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर आफ्रिकेचे फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले.
SA Vs AUS: केवढी भयानक उलथापालथ! ‘कांगारूं’वर आफ्रिकेचा विजय; WTC मध्ये भारताच्या स्थानामध्ये….
ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात सध्या तीन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळवली जात आहे. त्यातील दोन सामने 1-1 असे बरोबरीत सुटले आहेत. त्यामुळे हा तिसरा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात तिसरा सामना सुरू आहे. पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने भेदक आणि अचूक गोलंदाजी केली. सामन्याच्या पहिल्या दिवशी साऊथ आफ्रिकेच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली. मिचेल स्टार्कने आपल्या भेदक माऱ्याने संपूर्ण आफ्रिकन डावाला खिंडार पाडले. स्टार्कने अत्यंत अचूक आणि घातक गोलंदाजी करत १६.३ ओव्हर्समध्ये केवळ ७२ रन्स देऊन ६ विकेट्स आपल्या नावावर केल्या.
दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरल्यानंतर, सलामीवीर एडन मार्करम आणि मार्केस एकरमैन यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. एकरमैनने कसोटी सामन्यातही वनडेच्या स्टाईलने फलंदाजी केल्याचे दिसून आले. त्याने 95 रन्सची महत्वाची खेळी केली. तर त्याला एडन मार्करमने 78 रन्सची खेळी करत चांगली साथ दिली.
साऊथ आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 329 रन्स केल्या. पहिली विकेट आफ्रिकेने 158 रन्सवर गमावली. सलामीवीर एडन मार्करम आणि मार्केस एकरमैन यांनी चांगली पार्टनरशिप रचली आणि आफ्रिकेला एक मजबूत सुरुवात करून दिली. पहिल्या दोन विकेट्स चांगल्या स्थितीत पडल्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिकेची गाडी अचानक रुळावरून घसरली. संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा एकही रन न करता आउट झाला.
Ans: साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना सूरू आहे.
Ans: साऊथ आफ्रिके विरुद्ध मिशेल स्टार्कने तब्बल 6 विकेट्स घेतल्या आहेत.