फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
चॅम्पियन ट्रॉफी २०२५ : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीची लढाई आता खूपच रोमांचक बनली आहे. सध्या, भारत आणि न्यूझीलंड संघांनी गट अ मधून उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे, याशिवाय गट ब मधून अद्याप कोणताही संघ पात्र ठरलेला नाही. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या संघांमध्ये उपांत्य फेरीची लढाई सुरू आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये खराब हवामानामुळे मागील दोन सामने पावसामुळे रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या धडाकेबाज फलंदाजाने त्याच्या विधानाने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. या खेळाडूला वाटते की ही त्याची शेवटची आयसीसी स्पर्धा असू शकते.
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून खेळणारा रस्सी व्हॅन डर ड्यूसेनचे वक्तव्य चर्चेत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यांमध्ये कमालीची सुरुवात केली होती तर त्यांचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. गेल्या सामन्यात, रस्सी व्हॅन डर ड्यूसेन फलंदाजाने अफगाणिस्तानविरुद्ध शानदार अर्धशतकी खेळी केली. आता रस्सी व्हॅन डर ड्यूसेन म्हणाला की, “हे निश्चितच शक्य आहे की ही माझी शेवटची आयसीसी स्पर्धा असू शकते. इतके तरुण खेळाडू येत आहेत, जे खरोखर चांगले खेळत आहेत हे खूप छान आहे. ट्रिस्टन स्टब्ससारखे खेळाडू बाहेर बसले आहेत.
At 36 years old, Rassie van der Dussen is at peace with the Champions Trophy possibly being his last ICC tournament for South Africa
Full story: https://t.co/JJSvnhYnJ3 pic.twitter.com/nIKdhg56e0
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 27, 2025
पुढे तो म्हणाला की, जर मी चांगली कामगिरी केली नाही तर कोणीही माझी जागा घेणार नाही, या शक्यतेबद्दल मला माहिती नाही. रस्सी व्हॅन डर ड्यूसेन ३६ वर्षांचा झाला आहे आणि त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे असे स्पष्ट दिसत आहे. आतापर्यंत, दक्षिण आफ्रिकेने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये फक्त एकच सामना खेळला आहे, दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सध्या, आफ्रिकन संघ ३ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा पुढचा सामना इंग्लंडशी असेल.
रस्सी व्हॅन डर ड्यूसेनने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी १८ कसोटी, ६९ एकदिवसीय आणि ५० टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटी सामन्यांमध्ये ९०५ धावा केल्या आहेत, ज्यात ६ अर्धशतकांचा समावेश आहे. रॅसीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५१६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून ६ शतके आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, त्याने टी-२० मध्ये १२५७ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये ९ अर्धशतकांचा समावेश आहे.