Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानला मोठा धक्का! पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलणार

हल्ल्यामध्ये २८ पर्यटकांनी त्यांचा जीव गमावला आहे त्याचबरोबर १७ लोक अजूनही जखमी झाले आहेत. भारतामध्ये दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स आयोजित करण्यात आली होती, पण दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 24, 2025 | 04:42 PM
फोटो सौजन्य - X

फोटो सौजन्य - X

Follow Us
Close
Follow Us:

South Asian Athletics Championships : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सगळ्याच भारतीयांचा राग मस्तकात गेला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर देशवासीयांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहे. सध्या भारतामध्ये आयपीएल सुरु आहे, झालेल्या हल्ल्यामुळं सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यांमध्ये काल कोणत्याही प्रकारची आतिषबाजी आणि चिअरलीडर ठेवण्यात आले नव्हते हा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. त्याचबरोबर कालच्या सामन्यांमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंनी त्यांच्या हातावर काळ्या पट्ट्या हल्ल्यात जीव गमावलेल्या लोकांसाठी श्रद्धांजली म्हणून वाहिली आहे.

हल्ल्यामध्ये २८ पर्यटकांनी त्यांचा जीव गमावला आहे त्याचबरोबर १७ लोक अजूनही जखमी झाले आहेत. त्यामुळे भारतीयांचे मत आहे की पाकिस्तानकडून हा झालेल्या हल्ल्याचा बदल घेण्यात यावा. आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतामध्ये दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स आयोजित करण्यात आली होती, पण दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.

वीरेंद्र सेहवाग इशान किशनवर नाराज, त्याचा प्रामाणिकपणा आवडला नाही; म्हणाला- पंचही पैसे…

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी कोणतीही चूक न करता २८ पर्यटकांची हत्या केली. त्याच वेळी, सुमारे १७ लोक अजूनही रुग्णालयात त्यांचे प्राण वाचवण्यासाठी झगडत आहेत. या हल्ल्यामुळे जूनमध्ये होणारी स्पर्धा आता पुढे ढकलण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात येऊ शकते.

दक्षिण आशियाई अजिंक्यपद स्पर्धा पुढे ढकलण्यात आली

पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ही स्पर्धा जूनमध्ये होणार होती. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भूतानचे खेळाडू आधीच रांचीला पोहोचले होते आणि त्यांनी सरावही सुरू केला होता. तथापि, आता ही स्पर्धा कोणत्या तारखेला आयोजित केली जाईल याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. यापूर्वी ही स्पर्धा ३ ते ५ मे दरम्यान खेळवण्यात येणार होती, परंतु नंतर पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळण्यास विलंब झाल्यामुळे स्पर्धा पुढे ढकलावी लागली. ही स्पर्धा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणार होती, परंतु काही आठवड्यांपूर्वी ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली.

🚨#Breaking | Athletics Federation of India (AFI) President Bahadur Singh Sagoo explains why the South Asian Senior Athletics Championships are being rescheduled. 👉Rains and a potential clash of schedule with the Asian Championships were mentioned as the reasons. 📹… pic.twitter.com/FKVVMiXLVV — The Bridge (@the_bridge_in) April 24, 2025

अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बहादूर सिंह सांगो यांनी देखील यासंदर्भात जाहीरपणे सांगितले आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की, आपण जर एवढे चांगली स्पर्धा आयोजित करत आहोत पण पावसाची शक्यता त्यावेळेमध्ये जास्त आहे त्यामुळे आम्ही ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: South asian athletics championships to be held in india to be postponed after pahalgam terror attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 04:09 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack
  • Sports

संबंधित बातम्या

हरभजन सिंहने T20 विश्वचषकाबद्दल भविष्यवाणी! भारत-अफगाणिस्तानसह हे 4 संघ सेमीफायनलमध्ये, पाकिस्तानचा केला पत्ता कट
1

हरभजन सिंहने T20 विश्वचषकाबद्दल भविष्यवाणी! भारत-अफगाणिस्तानसह हे 4 संघ सेमीफायनलमध्ये, पाकिस्तानचा केला पत्ता कट

BCCI गौतम गंभीरला टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवणार का? राजीव शुक्ला यांनी सोडले मौन
2

BCCI गौतम गंभीरला टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवणार का? राजीव शुक्ला यांनी सोडले मौन

IND vs SL Pitch Report : भारत आज 2025 मधील शेवटचा क्रिकेट सामना खेळणार, जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी?
3

IND vs SL Pitch Report : भारत आज 2025 मधील शेवटचा क्रिकेट सामना खेळणार, जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी?

IND vs NZ मालिकेचे तिकीट या तारखेला खरेदी करू शकतात चाहते! MPCA कडून विद्यार्थी आणि दिव्यांग फॅन्ससाठी खास योजना
4

IND vs NZ मालिकेचे तिकीट या तारखेला खरेदी करू शकतात चाहते! MPCA कडून विद्यार्थी आणि दिव्यांग फॅन्ससाठी खास योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.