
Asian Para Games : अरेरे.. शत्रुसोबतही असं होऊ नये! भाविककुमार भरवाड अपात्र, पदक जिंकूनही रिकाम्या हाती परतावं लागणार
एशियन पॅरा गेम्स (Asian Para Games) 2026 मध्ये पुरुषांच्या 400 मीटर टी-47 फायनल धावण्याच्या शर्यतीत लेनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाविककुमार भरवाड याला अपात्र घोषित करण्यात आले. अशाप्रकारे त्याने जिंकलेले रौप्य पदक त्याच्याकडून काढून घेण्यात आले आहे.
गुरुवारी जपानच्या नागोया सिटी मिजुहो पार्क एथलेटिक स्टेडियममध्ये भाविककुमार 49.31 सेकंदासह दुसऱ्या स्थानी राहिला होता. त्याच्या पुढे आणखीन एक भारतीय दिलीप महादु गावित (टी-46) राहिला, ज्याने 48.27 सेकंदासह सुवर्णपदकाची कमाई केली.
दरम्यान, शर्यतीनंतर भाविककुमारला टीआर 18.2 (c) अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपात्र घोषित करण्यात आले. ही अपात्रता त्याने आपल्या निर्धारित लेनच्या नियमांचा पालन न केल्यामुळे लावण्यात आली आहे.
भाविककुमार अपात्र ठरल्याने आपसुकच जपानचा काकेरु इशिदा (49.58 सेकंद) दुसऱ्या स्थानी आला. त्याशिवाय उज्बेकिस्तानचा मारुफजोन मुरोडुलोए आणि श्रीलंकेचा सामन सुबासिंघे यांना संयुक्त रुपात तिसऱ्या स्थानाचे मान देण्यात आले. या दोन्ही धावपटूंनी समान 50.03 सेकंदासह धावण्याची स्पर्धा पुर्ण केली. या हंगामातील या दोघांची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली.
जिथे भाविककुमारला अपात्र घोषित करण्यात आले असले तरी, चांगली बाजू अशी की, आपला मराठमोळा दिलीप गावितने या स्पर्धेतील आपले दुसरे सुवर्ण पदक जिंकले आहे. याआधी दिलीप गावितने पुरुषांच्या 100 मीटर टी-47 गटात ही सुवर्ण पदक जिंकण्याची किमया केली होती.
दिलीप (टी-46 श्रेणी) ने 100 मीटर टी-47 च्या स्पर्धेत 10.69 सेकंदासह सर्वोत्तम वेळ आपल्या नावे करत गोल्ड मेडल जिंकले. भारतासाठी आणखीन एक यश बेसिलने संपादन केले. बेसिलने (टी-47 श्रेणी) 10.72 सेकंदासह रौप्य पदक आपल्या नावे करत स्पर्धेतील एक नवा विक्रम ही रचला.
दिलीप गावितने याअगोदर एशियन पॅरा गेम्स 2022 मध्ये पुरुषांच्या 400 मीटर टी-47 स्पर्धेत गोल्ड जिंकले होते, जे या स्पर्धेतील भारताचे ऐतिहासिक 100 वे पदक होते. त्याने पॅरिस 2024 पॅरालम्पिकमध्ये पुरुषांच्या 400 मीटर टी-47 स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली होती.
Ans: पुरुषांच्या 400 मीटर टी-47 अंतिम शर्यतीत लेनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याला अपात्र घोषित करण्यात आले.
Ans: त्याने 49.31 सेकंदांत शर्यत पूर्ण करून दुसरे स्थान मिळवले होते; मात्र अपात्रतेमुळे त्याचे रौप्यपदक काढून घेण्यात आले.
Ans: दिलीप गावितने पुरुषांच्या 400 मीटर टी-47 शर्यतीत 48.27 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले.