फोटो सौजन्य - Gujarat Titans सोशल मीडिया
Pitch report for Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans match : आयपीएल २०२५ च्या १९ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. हैदराबादच्या संघाने पहिल्या सामन्यात कमालीची कामगिरी केली होती त्यानंतर या हंगामाची सुरुवात निराशाजनक झाली आहे. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केल्यानंतर, एसआरएचला पुढील तीन सामन्यांमध्ये दारुण पराभवांना सामोरे जावे लागले. संघाचा स्फोटक फलंदाजी क्रम खूपच अपयशी ठरला आहे. टॉप ऑर्डरमध्ये ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या अपयशामुळे हैदराबादला मोठी किंमत मोजावी लागली. त्याचबरोबर संघाच्या गोलंदाजांची कामगिरीही काही खास राहिलेली नाही.
दुसरीकडे, गुजरातने सलग दोन विजयांची चव चाखली आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सला पराभवाचा सामना करावा लागला होता त्यानंतर त्यांनी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत, तर दुसरीकडे हैदराबादचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. फलंदाजीत साई सुदर्शन, शुभमन गिल आणि जोस बटलर यांनी चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजीत, मोहम्मद सिराजने ट्रम्प कार्ड असल्याचे सिद्ध केले आहे, तर साई किशोरनेही चांगली कामगिरी केली आहे.
आजच्या सामन्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत, यामध्ये हैदराबादचा संघाला कमबॅक करण्याची सुवर्णसंधी आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील रोमांचक सामना राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हे मैदान फलंदाजांसाठी स्वर्ग मानले जाते. खेळपट्टीवर चांगला उसळी असल्याने चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो. चेंडू सीमारेषेपलीकडे पाठवण्यासाठी फलंदाजांना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. तथापि, खेळपट्टी फिरकी गोलंदाजांनाही मदत करते आणि मोठ्या मैदानामुळे फिरकी गोलंदाजांना विकेट घेण्याची चांगली संधी असते.
HEAD vs SIRAJ. New ball. 🥶
The last time these two clashed on the cricket field, it made headlines! 👀#IPLonJioStar 👉 #SRHvGT | SUN, 6th APR, 6:30 PM on Star Sports Network & JioHotstar pic.twitter.com/oYCkrskicm
— Star Sports (@StarSportsIndia) April 6, 2025
राजीव गांधी क्रिकेट स्टेडियममध्ये आतापर्यंत एकूण ८० आयपीएल सामने झाले आहेत. यापैकी ३५ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे, तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ४४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. म्हणजेच या मैदानावर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय अधिक फायदेशीर ठरला आहे. हैदराबादने आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध याच मैदानावर ६ विकेट गमावून २८६ धावा केल्या होत्या, जो येथील सर्वोच्च धावसंख्या देखील आहे. तर २०१३ मध्ये दिल्लीचा संघ येथे ८० धावांवर सर्वबाद झाला होता.