Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH vs LSG : SRH च्या Abhishek Sharma ने क्रीडा जगतात उडवली खळबळ! IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला तो एकमेव भारतीय.. 

आयपीएल २०२५ च्या ६१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा दणदणीत पराभव केला. या सामन्यात २० चेंडूत ५९ धावा करून अभिषेक शर्माने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 20, 2025 | 11:54 AM
SRH vs LSG: SRH's Abhishek Sharma created a sensation in the sports world! He became the only Indian to achieve 'this' feat in IPL..

SRH vs LSG: SRH's Abhishek Sharma created a sensation in the sports world! He became the only Indian to achieve 'this' feat in IPL..

Follow Us
Close
Follow Us:

Abhishek Sharma IPL Records : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात ६१ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात हैद्राबादने एलएसजीला पराभूत केले. प्रथम फलंदाजी करत एलएसजीने २०५ धावा केल्या. प्रतिउत्तरात एसआरएच संघाने १९ व्या षटकातच टार्गेट पूर्ण करून एलएसजीचा पराभव केला. या सामन्यात हैद्राबादच्या अभिषेक शर्माने तुफानी खेळी करत चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याने २० चेंडूत ५९ धावांची शानदार खेळी केली. यामध्ये त्याने ४ चौकार आणि ६ षटकार लगावले.

अभिषेकच्या या शानदार खेळीच्या जोरावरच हैदराबादला ६ विकेट्सनी सामना आपल्या नावावर केला. आपल्या धमाकेदार खेळीदरम्यान अभिषेकने अनेक विक्रम देखील रचले आहे. आयपीएलच्या इतिहासात २० चेंडूंपेक्षा कमी वेळात चार अर्धशतके झळकावण्याचा विक्रम  अभिषेक शर्माने नोंदवाला आहे. असे करणारा अभिषेक एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे.

असे करणारा एकमेव भारतीय..

अभिषेकनच्या नावे अजून एका विक्रमाची नोंद जमा झाली आहे. आयपीएलमध्ये कोणत्याही भारतीयाने असा पराक्रम आजवर केलेला नाही.  अभिषेक शर्माने २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध १६ चेंडूत, २०२५ मध्ये लखनौविरुद्ध १८ चेंडूत आणि १९ चेंडूत (२०२४ मध्ये) अर्धशतके पूर्ण केली आहेत. तसेच २०२५ मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध १९ चेंडूत अर्धशतक  झळकावले. याशिवाय, अभिषेक शर्मा २०२४ पासून आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. २०२४ पासून आतापर्यंत अभिषेकने आयपीएलमध्ये २७ डाव खेळले असून त्यामध्ये त्याने एकूण ६५ षटकार लगावले आहेत.

हेही वाचा : बांगलादेशला नमवत भारताने SAFF U-19 Championship च्या विजेतेपदावर कोरले नाव..; पहा व्हिडिओ

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार (२०२४ पासून-भारतीय फलंदाज)

  1. ६५* – अभिषेक शर्मा (२७ डाव)
  2. ६० – रियान पराग (२७ डाव)
  3. ६० – विराट कोहली (२६ डाव)
  4. ४५ – शिवम दुबे (२६ डाव)
  5. ४५ – प्रभसिमरन सिंग (२३ डाव)

तसेच अभिषेक आयपीएलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना २००+ च्या स्ट्राईक रेटसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील बनला आहे. अभिषेकने आतापर्यंत लक्ष्याचा पाठलाग करत असताना २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने ५७३ धावा चोपल्या आहेत. त्याच्या पाठोपाठ  सूर्यकुमार यादव देखील आहे, त्याने लक्ष्याचा पाठलाग करत असताना २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने ५६४ धावा करण्याचा पराक्रम केला आहे.

हेही वाचा : IPL 2025 : ‘श्रेयस अय्यरचे श्रेय हिरावून घेतले..’, लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांचा प्रशिक्षक गौतम गंभीरवर निशाणा..

२००+ धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा

  1. अभिषेक शर्मा -५७३*
  2. सूर्यकुमार यादव -५६४
  3. नितीश राणा – ५३८
  4. विराट कोहली -५२०
  5. संजू सॅमसन – ५१९

 

Web Title: Srh vs lsg srhs abhishek sharma became the only indian to achieve this feat in the ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IPL 2025
  • IPL records
  • SRH vs LSG

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या
1

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
2

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
3

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
4

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.