Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alex Carey 150 runs in Asia : अ‍ॅलेक्स कॅरीने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिला विकेटकिपर

आता ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अ‍ॅलेक्स कॅरीने शनिवारी श्रीलंकेविरुद्ध इतिहास रचला. आता आशियामध्ये १५० किंवा त्याहून अधिक धावांची खेळी खेळणारा पहिला कांगारू यष्टीरक्षक बनला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 08, 2025 | 12:23 PM
फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया

फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

अ‍ॅलेक्स कॅरी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने कमालीची कामगिरी केली आहे. पहिल्या डावांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने श्रीलंकेला त्याच्या घरच्या मैदानावर २५७ धावांवर रोखले तर पहिल्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला एकतर्फी विजय मिळवून दिला. आता ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावांमध्ये ४१४ धावा केल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंनी शतक ठोकली आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने १३१ धावांची खेळी खेळली तर अ‍ॅलेक्स कॅरीने संघासाठी १५६ धावांची दमदार खेळी खेळून संघासाठी मोठी धावसंख्या उभी केली.

आता ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अ‍ॅलेक्स कॅरीने शनिवारी श्रीलंकेविरुद्ध इतिहास रचला. गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने १५६ धावांची शानदार खेळी केली. या खेळीसह, तो आता आशियामध्ये १५० किंवा त्याहून अधिक धावांची खेळी खेळणारा पहिला कांगारू यष्टीरक्षक बनला आहे.

SL vs AUS : स्टीव्ह स्मिथ नावाचं कसोटीत वादळ… टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पराक्रम करणारा हा एकमेव खेळाडू

कॅरी गिलख्रिस्टच्या क्लबमध्ये सामील

शुक्रवारी म्हणजेच ८ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावून अ‍ॅलेक्स कॅरी आशियात कसोटी शतक झळकावणारा दुसरा ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक ठरला. क्रिकेटच्या सर्वात प्रदीर्घ स्वरूपात कॅरीचे हे दुसरे शतक होते आणि डिसेंबर २०२२ नंतरचे त्याचे पहिले शतक होते. त्याने ११८ चेंडूत शतक झळकावले आणि आशियामध्ये चार शतके झळकावणाऱ्या माजी दिग्गज यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या यादीत सामील झाला.

कोणत्या परदेशी खेळाडूने सर्वाधिक शतके केली

अ‍ॅलेक्स कॅरीने चार शतकांपैकी त्याने बांगलादेश आणि श्रीलंकेत प्रत्येकी एक शतक ठोकले आहे, तर दोन शतके भारतात ठोकली आहेत. आशियाई नसलेल्या खेळाडूने सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम झिम्बाब्वेच्या दिग्गज फलंदाज अँडी फ्लॉवरकडे आहे, ज्याने पाच शतके झळकावली आहेत.

कॅरीने स्वीकारली कर्णधार स्मिथची जबाबदारी

संघाने फक्त ९१ धावांत तीन विकेट गमावल्या असताना तो फलंदाजीला आला. येथून त्याने कर्णधार स्टीव्ह स्मिथसोबत जबाबदारी स्वीकारली आणि चौथ्या विकेटसाठी २५९ धावांची भागीदारी केली. यादरम्यान, स्मिथने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ३६ वे शतक झळकावले आणि १३१ धावांची दमदार खेळी केली. या दोन्ही खेळाडूंमधील या भागीदारीच्या जोरावर, कांगारू संघाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या डावात आतापर्यंत १०० पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली आहे.

Unbeaten centuries from Steve Smith and Alex Carey handed Australia the advantage over Sri Lanka 🔥#WTC25 | #SLvAUS 📝: https://t.co/PVPw6kEWQP pic.twitter.com/l1kvVHDvmW — ICC (@ICC) February 7, 2025

ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये देखील कमालीची कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या सामन्यांमध्ये सुद्धा ऑस्ट्रेलियन संघाची कामगिरी पाहता मजबूत स्थितीत संघ उभा आहे. पण चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाचे पाच खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाले आहेत. कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल मार्श, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड, कॅमेरॉन ग्रीन आणि मार्कस स्टोइनिस चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडले आहेत.

Web Title: Sri lanka vs australia alex carey 150 runs in asia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 12:15 PM

Topics:  

  • Alex Carey
  • cricket
  • SL vs AUS

संबंधित बातम्या

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
1

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
2

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
3

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
4

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.