
sri lanka cricket
क्रिकेटच्या मैदानावर झालेल्या हाणामारीनंतर ६२ वर्षीय प्रशिक्षक सुमित फर्नांडो यांचे निधन झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका १७ वर्षीय शालेय क्रिकेटपटूला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी दोन खेळाडूंमध्ये पिण्याच्या पाण्यावरून वाद झाला, ज्याचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. यादरम्यान सुमित फर्नांडो जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचे निधन झाले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या १७ वर्षीय खेळाडूला मंगळवारी कोलंबो न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १७ ऑगस्टपर्यंत बालसुधारगृहाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ही घटना कोलंबो येथील ब्लूमफील्ड क्रिकेट अँड ॲथलेटिक क्लबमध्ये घडली. ८ ऑगस्ट रोजी, पिण्याच्या पाण्यावरून दोन खेळाडूंमध्ये वाद झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, खेळाडू पाणी पिण्यासाठी नळाजवळ गेले, पण नळातून पाणी येत नव्हते. त्यानंतर, प्रशिक्षक आणि खेळाडूंमधील परिस्थिती चिघळली आणि त्यांच्यात वाद झाला.दरम्यान, दोन खेळाडूंमध्ये भांडण झाले, ज्या दरम्यान कथित १७ वर्षीय मुलाने प्रशिक्षक फर्नांडो यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर फर्नांडो यांना कोलंबो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण उघड करण्यात आलेले नाही, परंतु तपासात असे समोर आले आहे की प्रशिक्षक फर्नांडो यांना बऱ्याच काळापासून हृदयाचा त्रास होता.
सुमित फर्नांडो हे मोराटुवा येथील प्रिन्स ऑफ वेल्स कॉलेजमध्ये माजी क्रिकेट प्रशिक्षक होते. त्यांनी सध्याचा श्रीलंकेचे एकदिवसीय कर्णधार कुसल मेंडिस यांना त्यांच्या शालेय जीवनात प्रशिक्षण दिले होते. त्यांनी शालेय स्तरावर इतर अनेक प्रतिभावान क्रिकेटपटूंनाही प्रशिक्षण दिले. नंतर फर्नांडो यांनी ब्लूमफील्ड क्रिकेट अँड ॲथलेटिक क्लबचे क्युरेटर म्हणून काम पाहिले. सुमित फर्नांडो यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस या घटनेचा तपास करत असून, यात सहभागी असलेल्या खेळाडूंची चौकशी करत आहेत.
IND vs SL: गॉल कसोटीत टीम इंडियाचा ‘स्पिन’ मास्टरप्लॅन! 3 डावखुरे फिरकीपटू मैदानात उतरणार?