फोटो सौजन्य – X
सुनील गावस्कर यांंनी त्याच्या करिअरमध्ये केलेले रेकाॅर्ड्स : भारताच्या क्रिकेटमध्ये त्याचबरोबर जागतिक स्तरावर 80 आणि 90 चा काळ गाजवणारे लिटिल मास्टर सुनील गावस्कर हे आज त्याचा 76 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी त्याच्या करिअरमध्ये अनेक रेकाॅर्ड नावावर केले आहेत. ‘लिटिल मास्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावस्कर यांनी भारतीय क्रिकेटला अशी उंची दिली की आज जगाला विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिलसारखे खेळाडू मिळाले आहेत.
परदेशात भारताला संघर्ष करावा लागत असताना, गावस्कर यांनी एकट्याने जगातील सर्वोत्तम गोलंदाजी स्वीकारली आणि प्रभावी विक्रम रचले. सध्या भारतासाठी बऱ्याचदा काॅमेट्री देखील करताना दिसतात. कसोटीत १०,००० धावा आणि ३४ शतके ठोकणारा तो जगातील पहिला फलंदाज होता. ५ फूट ५ इंच उंचीच्या गावस्कर यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत, पण आज त्यांच्या वाढदिवशी, अशा ३ विक्रमांबद्दल जाणून घेऊया जे आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही.