
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव याने 2024 मध्ये झालेल्या विश्वचषकामध्ये सर्वाच्या आठवणीमध्ये राहिलेला कॅच घेतला होता. तर त्यानंतर त्याच्या फलंदाजीमध्ये फाॅर्म नसल्यामुळे त्याच्या अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. भारतीय संघ टी-२० स्वरूपात सातत्याने विजय मिळवत आहे, परंतु कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म अजूनही चिंतेचा विषय आहे. गेल्या वर्षभरात सूर्या सतत त्याच्या फलंदाजीच्या क्रमात बदल करत आहे, परंतु त्याचा त्याच्या फलंदाजीवर परिणाम होत आहे.
एकेकाळी टी-२० स्वरूपात संघाचा नंबर वन फलंदाज असलेला सूर्या आता मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरत आहे. त्याच्या फलंदाजीने अनेकदा त्याने भारताच्या संघाला अनेक सामने एकतर्फी जिंकून दिले आहेत. एका कार्यक्रमादरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्या खराब फॉर्मबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी संघाची निवड करण्यात आली आहे. खराब फॉर्म असूनही, सूर्यकुमार यादव या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करेल. जीएलएस विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमात त्याच्या फॉर्मबद्दल बोलताना कर्णधार सूर्य म्हणाला, “मला वाटते की खेळ खूप काही शिकवतो आणि प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत असा एक काळ येतो जेव्हा त्याला वाटते की तो शिकत आहे. म्हणून, हा माझ्यासाठी शिकण्याचा टप्पा आहे… पण माझे १४ सहकारी माझ्यासाठी जबाबदारी घेत आहेत.
VIDEO | Ahmedabad: Indian skipper Suryakumar Yadav at GLS University says, “According to me, sport teaches you a lot, and in every sportsperson’s career there is a time when you feel it is a learning stage, so it is that learning stage for me. But my 14 soldiers are covering it… pic.twitter.com/4YsDW5TszI — Press Trust of India (@PTI_News) December 20, 2025
जेव्हा मी आक्रमक होतो तेव्हा काय होते हे त्यांना माहिती आहे. मी खूप सकारात्मक आहे आणि कठोर परिश्रम करतो आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण तेच कराल. जर आपल्याला चांगले गुण मिळाले नाहीत तर आपण हार मानत नाही. आपण अधिक गुण मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करतो. मीही तेच करतो.”
२०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी टीम इंडिया घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. ही मालिका २१ जानेवारी २०२६ रोजी सुरू होईल आणि अंतिम सामना ३१ जानेवारी रोजी होणार आहे. भारत ७ फेब्रुवारी रोजी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आपला पहिला सामना खेळेल. कर्णधार सूर्यकुमार यादवला आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत धावा कराव्या लागतील. सूर्याव्यतिरिक्त इतर सर्व फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे.