फोटो सौजन्य - सोशल मिडिया
India vs Pakistan U19 Asia Cup Final : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेल्या आशिया कर अंडर 19 संघाचा फायनलचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानला पहिले फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने पहिले फलंदाजी करुन 8 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 347 धावा केल्या आहेत.
समीर मिनहासने पाकिस्तानकडून शानदार शतकी खेळी केली. त्याने भारतीय गोलंदाजांना खंबीरपणे उभे ठेवले. भारतीय गोलंदाज बराच वेळ समीरची विकेट शोधत होते , परंतु डावाच्या ४३ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्यांची प्रतीक्षा संपली. दीपेश द्रवेंद्रनने कनिष्क चौहानच्या हातून समीर मिनहासला बाद केले. समीर मिन्हास १७२ धावांवर बाद झाल्यानंतर भारताने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. पाकिस्तानने फक्त १५ चेंडूत ४ विकेट गमावल्या.
या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने चांगली सुरुवात केली आहे, पण भारतीय संघाची फलंदाजी देखील चांगली या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता भारताचे फलंदाज कशी कामगिरी करतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दिपेंद्र याने भारतीय संघासाठी 3 विकेट्स नावावर केले आहेत. हेनील पटेल आणि खलिन पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट नावावर केले आहेत. कनिश चौहान याने एक विकेट नावावर केला.
Innings Break! 3⃣ wickets for Deepesh Devendran 👌
2⃣ wickets each for Khilan Patel and Henil Patel 👍 A 🎯 of 348 for India U19 to clinch the #MensU19AsiaCup2025 Scorecard ▶️ https://t.co/ht0DLU8XQ3 pic.twitter.com/iAMhAfgurX — BCCI (@BCCI) December 21, 2025
टीम इंडिया विक्रमी नवव्या अंडर-१९ आशिया कपचे विजेतेपद जिंकण्याचे लक्ष्य ठेवेल. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेचा ८ विकेट्सने पराभव केला, तर पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येण्याची ही दुसरी वेळ असेल. दोन्ही संघ पहिल्यांदाच लीग टप्प्यात भेटले होते, जिथे भारताने ९० धावांनी सामना जिंकला.






