फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
सूर्यकुमार यादव-संजू सॅमसन : भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनने त्याच्या दमदार फलंदाजीने बांग्लादेशला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडलं नाही. भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी केली आणि भारताच्या संघाने पहिली विकेट खूप लवकर गमावली. भारताचा फलंदाज संजू सॅमसन भारतीय संघामध्ये बरेच महिने जागा मिळाली नाही त्याचबरोबर त्याचा फॉर्मही चांगला नव्हता. त्यानंतर त्याने बऱ्याच वेळानंतर टीम इंडियासाठी मोठी खेळी खेळली आहे. कालच्या सामन्यांमध्ये मैदानावर संजू सॅमसन नावाचं वादळ आलं आणि भारताच्या संघाने धावांचा पाऊस केला. संजू सॅमसनला साथ देत भारताचा कर्णधार सूर्याने सुद्धा त्याची बॅट चालवली. यामध्ये संजू सॅमसनने त्याच्या नावावर अनेक विक्रम नावावर केले आहेत. संजूने ४३ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं. तर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने संघासाठी मोठी खेळी खेळली. सूर्यकुमार यादवने ३५ चेंडूंमध्ये ७५ धावा केल्या.
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सामना झाल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, मी खरंच संजू सॅमसनसाठी खूप खुश आहे. त्याने अजिबात त्याच्या शतक बद्दल विचार केला नाही त्याला वाटलं की संघासाठी मला खेळायचं आहे त्यामुळे तो नेहमी चांगले शॉट खेळत राहिला. आता सूर्यकुमार यादवचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे त्यामध्ये भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव बसमध्ये बसलेला दिसत आहे. यावेळी बसबाहेर अनेक चाहते आले होते, तेव्हा सूर्यकुमार त्याच्या चाहत्यांना संजू सॅमसनचा फोटो दाखवत होता. यावर दिसून येते की सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांच्यामध्ये मैत्री किती पक्की आहे.
टीम इंडियाने हा सामना १३३ धावांनी जिंकला. धावांच्या फरकाने भारताचा हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे. भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय न्यूझीलंडविरुद्ध झाला, जेव्हा टीम इंडियाने १६८ धावांनी विजय मिळवला. तर टीम इंडियाने आयर्लंडचा १४३ धावांनी पराभव केला आहे.