
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमार यादवला रोहित शर्माच्या विक्रमाशी करणार बरोबरी (Photo Credit - X)
सूर्यकुमार यादवच्या कामगिरीवर लक्ष
२०२६ च्या सुरुवातीला होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि यात कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सूर्याला अपेक्षित फॉर्म दाखवता आला नव्हता. मात्र, आता वर्ल्ड कपपूर्वी त्याला फॉर्ममध्ये येणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा: IND vs SA T20 मालिकेच्या वेळेत बदल! आता सर्व सामने ‘या’ वेळेपासून खेळले जाणार
टी-२० शतकांमध्ये रोहित शर्माशी बरोबरीची संधी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवने जर एक शतकी खेळी केली, तर तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचेल. सध्या रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल हे दोघेही ५-५ शतकांसह संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. सूर्यकुमार यादवने आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ४ शतके झळकावली आहेत. सूर्याने आतापर्यंत ९५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३६.७२ च्या सरासरीने २७५४ धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचाही विक्रम मोडणार
सूर्यकुमार यादवला या मालिकेत रोहित शर्माचा आणखी एक विक्रम मोडण्याची संधी आहे. सूर्यकुमार यादवने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४१.३३ च्या सरासरीने ३७२ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या (४२९ धावा) नावावर आहे. जर सूर्याने या आगामी ५ सामन्यांच्या मालिकेत ५८ किंवा त्याहून अधिक धावा केल्या, तर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू बनणार.
टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघांसाठी संघ
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिळक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सनदर
दक्षिण आफ्रिका: एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेव्हिस, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, लुंगी एनगिडी, ॲनरिक नॉर्टजे, सेंट ट्रिब्स, लुथॉब्स आणि सेंट ट्रिब्स.