भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सलील अंकोल यांच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यू झाला आहे? पुण्यामधील डेक्कन येथील गल्ली क्रमांक 14 मध्ये अंकोला यांच्या आई मृतावस्थेत आढळल्या आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
संशयास्पद मृत्यू?
माला अशोक अंकोला असे त्यांचे नाव असून त्यांचे वय 77 होते. त्या घरात एकट्याच राहत होत्या. ज्यावेळी कामवाली बाई त्यांच्या घरी कामासाठी गेली त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेनंतर सलील अंकोला यांनी गुड बाय मॉम अशी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे.अंकोला यांचे वडिल हे आयपीएस दर्जाचे पोलिस अधिकारी होते.
अंकोला यांच्या आईचा मृतदेह अशा रितीने आढळल्याने या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले जाणार असल्याची माहिती मिळत आहेत. त्यासंबंधी चौकशी केली जाणार आहे. सलील