
T20 World Cup 2026: 'Shubman is an excellent player, but...' Selector Agarkar's statement after dropping Gill is creating a buzz.
Ajit Agarkar commented on Shubman Gill : २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने २० डिसेंबर रोजी २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या निवडीमधील आश्चर्यजनक बाब म्हणजे भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार आणि टी-20 उप-कर्णधार शुभमन गिलला संघातून डच्चू दिला आहे. उपकर्णधारपद आता अक्षर पटेलकडे असणार आहे. गिलल वगळल्यानंतर अजित निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी शनिवारी सांगितले की, शुभमन गिलने अलिकडच्या सामन्यांमध्ये धावा न केल्यामुळे आणि संघातील अडचणींमुळे त्याला टी-२० विश्वचषक संघातून वगळण्यात आले. भारतीय टी-२० संघाचा नुकताच उपकर्णधार म्हणून नियुक्त झालेला गिल श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत प्रभावी कामगिरी करू शकला नाही. त्याने मालिकेत चार, शून्य आणि २८ धावा केल्या, तर दुखापतीमुळे तो पाचवा सामना गमावला. संघ घोषणेनंतर पत्रकार परिषदेत आगरकर म्हणाले, आम्हाला माहित आहे की तो किती महान खेळाडू आहे, परंतु कदाचित तो सध्या इतक्या धावा करत नाहीये.
पुढे आगरकर म्हणाले की, दुर्दैवाने, गेल्या विश्वचषकातही त्याला वगळण्यात आले कारण आम्ही वेगळ्या संघासह खेळण्याचा निर्णय घेतला. संघ निवडताना संयोजन विचारात घेतले पाहिजे. जेव्हा तुम्ही १५ जणांचा संघ निवडता तेव्हा एखाद्याला वगळावे लागते आणि दुर्दैवाने, यावेळी गिलला वगळण्यात आले. संघ व्यवस्थापनाला वरच्या फळीत एक अतिरिक्त यष्टीरक्षक हवा होता, ज्यामुळे एका फलंदाजाचे बलिदान झाले. नुकत्याच संपलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या इशान किशनला प्राधान्य देण्यात आले. आम्ही या संयोजनाकडे पाहत होतो आणि वरच्या फळीत फलंदाजी करू शकेल अशा यष्टीरक्षकाची गरज आम्हाला वाटली.
आगरकर जितेशबद्दल बोलताना म्हटले की, जितेशची काहीही चूक केली नाही, पण आम्हाला संयोजन आणि वरच्या क्रमात यष्टीरक्षकाची गरज लक्षात ठेवावी लागली. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनेही गिलला वगळण्याचे मुख्य कारण संयोजन असल्याचे सांगितले. सूर्या म्हणाला, टी २० विश्वचषक (२०२४) नंतर, जेव्हा आम्ही श्रीलंकेला गेलो होतो, तेव्हा आम्ही काही सामन्यांमध्ये २०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या आणि गिल त्या संघाचा भाग होता. आम्हाला वरच्या क्रमात एक यष्टीरक्षक आणि खालच्या क्रमात रिंकू किंवा वाशी (वॉशिंग्टन सुंदर) असावा अशी आमची इच्छा होती, म्हणून आम्हाला वरच्या क्रमात एक अतिरिक्त यष्टीरक्षक ठेवावा लागला. गिलच्या फॉर्मबद्दल कोणताही प्रश्न नाही. सूर्यकुमारने त्याच्या दीर्घकाळाच्या घसरणीबद्दल फारशी चिंता व्यक्त केली नाही आणि आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी त्याची स्फोटक फलंदाजी पुन्हा मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला.