
दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स येणार आमनेसामने
अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर रंगणार चुरशीचा सामना
प्ले ऑफसाठी दोन्ही संघांना विजय महत्वाचा
Tata IPL 2026 DC Vs RR Live Updates: आज संध्याकाळी दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये सामना रंगणार आहे. आज आयपीएलचा 62 वा सामना संध्याकाळी होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. त्या आधी अर्धा तास अक्षर पटेल आणि रियान पराग टॉससाठी मैदानात उतरतील. आजच्या सामन्याचा पीच रिपोर्ट जाणून घेऊयात.
आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. राजस्थान रॉयल्स सध्या पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. तर दिल्लीचा संघ आठव्या स्थानावर आहे. राजस्थानचे 12 पॉईंट्स आहेत. तर दिल्लीचे 10 पॉईंट्स आहेत. त्यामुळे आजचा सामना रोमांचक असणार आहे. दोन्ही संघांना विजय महत्वाचा असणार आहे. दिल्लीकहा विजय झाल्यास त्यांच्या प्ले ऑफच्या आशा वाढणार आहेत. तर राजस्थानचा विजय झाल्यास प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी त्यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
काय आहे आजचा पीच रीपोर्ट?
आजचा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. दिल्लीचे हे मैदान ऐतिहासिकदृष्ट्या फलंदाजांसाठी नंदनवन मानले जाते. मात्र काही ओव्हर झाल्यावर स्पिनर्सला मदत मिळते. इतर मैदानांच्या तुलनेत मैदानचा आकार लहान असल्याने मोठा स्कोअर या ठिकाणी पाहायला मिळतो.
सामन्याच्या मध्यंतरात खेळपट्टी स्लो होऊ शकते. त्यामुळे राजस्थान आणि दिल्लीच्या स्पिनर्सला मदत मिळू शकते. संध्याकाळी या ठिकाणी दव पडण्याचा अंदाज आहे. दव पडले तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे कठीण जाऊ शकते. या मैदानावर टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार घेऊ शकतो. धावांचा पाठलाग करणे येथे सोपे समजले जाते. त्यामुळे आजच्या सामन्यात मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते.
Playoffs Scenarios: ‘असे’ घडले तर RCB जाणार प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? धक्कादायक समीकरण उडवेल झोप
दिल्ली कॅपिटल्सचा संघ: के.एल. राहुल (यष्टिरक्षक), पाथुम निसांका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिझवी, आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, काइल जेमीसन / लुंगी एंगिडी, टी. नटराजन / मुकेश कुमार.
राजस्थान रॉयल्सचा संघ: यशस्वी जयस्वाल, रविंद्र जडेजा, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, वैभव सूर्यवंशी, शिमरन हेटमायर, डोनोवन फरेरा, शुभम दुबे, यश राज, ब्रिजेश शर्मा, संदीप शर्मा