लखनौने दिल्ली कॅपिटल्सला दिले 144 धावांचे लक्ष्य
मोहम्मद शामीने पहिल्याच चेंडूवर राहुलला केले बाद
अब्दुल समदने सावरला लखनौचा डाव
LSG vs DC IPL 2026 Live Updates: आज लखनौच्या एकाना स्टेडियमवर लखनौ विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पार पडला. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून लखनौला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रित केले होते. लखनौने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 143 धावा केल्या. त्यानंतर 144 धावांचा पाठलाग (IPL 2026) करण्यासाठी दिल्लीचा संघ मैदानात उतरला. मात्र मोहम्मद शामीने पहिल्याच चेंडूवर केएल राहुलला बाद केले. दिल्ली कॅपिटल्सने लखनौवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.
दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात म्हणावी तशी चांगली झाली नाही. पहिल्याच चेंडूवर केएल राहुल बाद झाला. तर पथूम निसांका केवळ 1 धावा करून बाद झाला. तर डावखुरा फलंदाज नितीश राणा 15 धावा करून स्लीपमध्ये असलेल्या खेळाडूकडे झेल देऊन बाद झाला. तर प्रिन्स यादवने कर्णधार अक्षर पटेलला शून्यावर बाद केले. त्याआधी प्रिन्स यादवने निसांकाला बाद केले. मोहसीन खानने नितीश राणाला बाद केले. समीर रिझवी स्टब्सने 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी करून अडचणीत असलेल्या दिल्लीला विजयापर्यंत पोहोचवले.
लखनौची फलंदाजी कशी राहिली?
मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर ऋषभ पंत विचित्ररित्या बाद झाला. दिल्ली कॅपिटल्सकडून तिसरी ओव्हर टाकण्यासाठी मुकेश कुमार याला संधी देण्यात आली. दरम्यान मिशेल मार्श स्ट्राईकवर होता. मुकेश कुमारने टाकलेला बॉल मिशेल मार्शने सरळ फटकावला. दरम्यान तो बॉल मुकेश कुमारच्या हाताला लागून तो बॉल स्टंपला लागला. दुसऱ्या बाजूला ऋषभ पंत नॉन स्ट्राईकवर होता. मात्र तो क्रीजच्या बाहेर असल्याने ऋषभ पंत बाद झाला.
Match 5. 17.1: Abdul Samad to Sameer Rizvi 6 runs, Delhi Capitals 145/4 https://t.co/lfP7dRNKfg #TATAIPL | #LSGvDC — IndianPremierLeague (@IPL) April 1, 2026
त्यानंतर एडेन मारक्रमने आल्यावर एक षटकार मारला. मात्र तो देखील केवळ 11 धावा करून बाद झाला. तर लखनौसाठी सर्वाधिक धावा करण्यात दुसऱ्या स्थानावर असणार आयुष बडोनी 0 धावा करून बाद झाला. त्यानंतर आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध असणार निकोलस पूरन केवळ 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर अब्दुल समदने 36 धावा करून संघाला धावसंख्या पुढे नेण्यास मदत केली. तर मुकुल चौधरी 14 धावा तर मोहम्मद शामी 1 धावा करून बाद झाला.
LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने लखनौच्या ‘नवाबां’ना रोखले; अक्षरसेनेला विजयासाठी 144 धावांची गरज
लखनौची गोलंदाजी कशी राहिली?
लखनौकडून पहिली ओव्हर मोहम्मद शामीने टाकली. मोहम्मद शामीने पहिल्याच चेंडूवर केएल राहुलला बाद केले. लखनौकडून मोहम्मद शामीने 1 तर मोहसीन खानने 2 आणि प्रिन्स यादवने 2 विकेट्स पटकावल्या. सुरुवातीला दिल्लीला अडचणीत आणणाऱ्या लखनौच्या गोलंदाजांना आपल्या संघाला विजय प्राप्त करून देता आला नाही.
दिल्ली कॅपिटल्सची टीम: के.एल. राहुल, पथुम निसंका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल (कर्णधार), कुलदीप यादव, टी. नटराजन, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी
आज IPL मध्ये राडा! LSG कडून Rishabh Pant ‘या’ नंबरवर खेळणार? कोच म्हणाले, “तुम्हाला इथे बसून…”
एलएसजीची टीम: जोश इंग्लिश, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), निकोलस पूरन, एडेन मार्करम, आयुष बदोनी, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, मयंक यादव / मोहसीन खान, शाहबाज अहमद / अर्शीन कुलकर्णी






