Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK is Back! संजूच्या वादळी खेळीसमोर DC हतबल; चेन्नईचा IPL मधला पहिला ‘सुपर’ विजय

चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के दिले. खलील अहमदने केएल राहुलची विकेट घेतली. तर अंशूल कंबोजने पथूम निसांकाला आउट केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 11, 2026 | 11:33 PM
CSK is Back! संजूच्या वादळी खेळीसमोर DC हतबल; चेन्नईचा IPL मधला पहिला ‘सुपर’ विजय
Follow Us
Follow Us:

चेन्नई सुपर किंग्जने दिल्लीला दिले 213 रन्सचे टार्गेट 
दिल्ली पॉवर प्लेमध्ये गमावल्या 2 विकेट्स 
ए. एम. चिदंबरम स्टेडियमवर पार पडला सामना

Tata IPL 2026 DC vs CSK Live Updates: आज चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियम चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात (DC Vs CSK) सामना पार पडला. या सामन्यात दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी केली. संजू सॅमसनच्या शतकी खेळीच्या जोरावर 212 रन्स केल्या आणि दिल्लीला 213 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 23 रन्सने पराभव केला आहे.

दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी

213 रन्सचा पाठलाग करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुल आणि पथूम निसांका सलामीवीर म्हणून खेळण्यासाठी आले. त्यांनी दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. मात्र त्याचे रूपांतर मोठ्या खेळीमध्ये ते करू शकले नाहीत. मागच्या सामन्यात वादळी खेळी करणारा केएल राहुल केवळ 18 रन्स करून आउट झाला. तर 41 रन्सची खेळी करून पथूम निसांका आउट झाला. पॉवर प्लेमध्ये दिल्लीने आपल्या दोन विकेट्स गमावल्या. गेल्या काही सामन्यांमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा समीर रिझवी 6 रन्स करून आउट झाला. डेव्हिड मिलर 17 रन्स करून आउट झाला. आशुतोष शर्मा 19 रन्स करून आउट झाला. स्टब्सने अर्धशतकी खेळी केली. मात्र त्याची झुंज अपयशी ठरली.

Match 18. WICKET! 19.6: Lungisani Ngidi 3(5) ct Gurjapneet Singh b Anshul Kamboj, Delhi Capitals 189 all out https://t.co/BzGc6O65jX #TATAIPL | #CSKvDC — IndianPremierLeague (@IPL) April 11, 2026

दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी 

दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये चेन्नईच्या फलंदाजांची विकेट मिळवता आली नाही. दरम्यान सलामीची जोडी कर्णधार अक्षर पटेलने फोडली. त्याने ऋतुराज गायकवाडला 15 रन्सवर आउट केले. अक्षर पटेलने 4 ओव्हर्समध्ये 39 रन्स दिल्या. दिल्लीच्या गोलंदाजांना चेन्नईच्या फलंदाजांनी विकेट मिळू दिली नाही. लुंगी एनगीडीने 4 ओव्हर्समध्ये 41 रन्स दिल्या. तर कुलदीप यादवने 2 ओव्हर्समध्ये 24 रन्स दिल्या.

चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करण्यासाठी चेन्नईच्या संघाला आमंत्रित केले. चेन्नई सुपर किंग्जकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन मैदानात सलामीची जोडी म्हणून खेळण्यासाठी आले. पॉवर प्लेमध्ये गायकवाड आणि सॅमसनने चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार ऋतुराज गायकवाड केवळ 15 रन्स करून आउट झाला. त्यानंतर आयुष म्हात्रे खेळण्यासाठी आला. गेल्या तीन सामन्यात चांगली खेळी करू न शकलेल्या संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी केली.

CSK vs DC: 53 चेंडूत Sanju Samson चे तडाखेबंद शतक; दिल्लीचे ‘कॅपिटल’ राहणार की बुडणार? उभा केला 211 धावांचा डोंगर

चेन्नई सुपर किंग्जची गोलंदाजी

चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के दिले. खलील अहमदने केएल राहुलची विकेट घेतली. तर अंशूल कंबोजने पथूम निसांकाला आउट केले. जेमी ओव्हरटनने जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या समीर रिझवीला आउट केले. तसेच गुर्जपनीत सिंगने कर्णधार अक्षर पटेलची विकेट घेतली. तर जेमी ओव्हरटनने मिलरला आउट केले.

Worthy of watching on loooop! ➰ 🎥 Sarfaraz Khan with a 𝗦𝗧𝗨𝗡𝗡𝗘𝗥 of a grab 🫴 Updates ▶️ https://t.co/BzGc6O65jX #TATAIPL | #KhelBindaas | #CSKvDC | @ChennaiIPL pic.twitter.com/ve2q6V6a5z — IndianPremierLeague (@IPL) April 11, 2026

 

चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य टीम:  संजू सॅमसन (यष्टिरक्षक), आयुष म्हात्रे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, सरफराज खान, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, राहुल चहर,मॅट हेन्री.

आऊट न होता 59 धावा काढून Ayush Mhatre ने का सोडले मैदान, Vaibhav Sooryavanshi च्या मित्राबरोबर नक्की काय घडले?

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल (यष्टिरक्षक) , पाथुम निसांका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, कुलदीप यादव, विप्रज निगम, टी. नटराजन, लुंगी एन्गिडी, समीर रिझवी

Web Title: Tata ipl 2026 live updates chennai supr kings beat delhi capitals by 23 runs chepock stadium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 11:30 PM

Topics:  

  • CSK vs DC
  • IPL 2026
  • Sanju Samson

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.