
संजू सॅमसनने लगावले शानदार शतक
चेन्नईने मुंबईला दिले 208 रन्सचे टार्गेट
अकील हुसेनने घेतल्या 4 विकेट्स
Tata IPL 2026 CSK vs MI Live Updates: आयपीएलच्या हंगामातील आज सर्वात मोठा महामुकाबला पार पडला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने 207 रन्स केल्या. संजू सॅमसनच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला चेन्नईला 208 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुमई इंडियन्सला 103 रन्सने पराभूत केले आहे. मुंबई इंडियन्स 104 रन्सवर ऑल आउट झाली.
मुंबई इंडियन्सची फलंदाजी
चेन्नई सुपर किंग्जने दिलेले 208 रन्सचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मुंबईकडून दिनेश मालेवार आणि क्विंटन डी कॉक खेळण्यासाठी उतरले. मात्र मुंबईची फलंदाजी पॉवर प्लेमध्येच कोलमडली. दिनेश मालेवर आजच्या सामन्यात देखील चांगली खेळी करू शकला नाही. तो एकही रन करता आउट झाला. त्यापाठोपाठ मागच्या दोन्ही सामन्यात चांगली खेळी करणारा क्विंटन डी कॉक देखील केवळ 7 रन्स करून आउट झाला.
त्यानंतर मागच्या सामन्यात अर्धशतक केलेला नमन धीरने देखील यावेळी निराशा केली. यावेळी नमन धीर आपले खातेही उघडू शकला नाही. त्यानंतर मुंबईकडून सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा खेळण्यासाठी आले. 100 रन्सच्या आतच मुंबईने आपल्या 7 विकेट्स गमावल्या. सूर्यकुमार यादव 36 रन्स करून आउट झाला. तिलक वर्माने 37 रन्स केल्या. कर्णधार हार्दिक पंड्या खेळण्यासाठी मैदानात आला आणि लगेच आउट होऊन मैदानातून परत गेला. तो केवळ 1 रन करू शकला. तर रदरफोर्ड शून्यावर आउट झाला.
CSK Vs MI Live: बॅट आहे की तळपती तलवार! संजूचे ‘एमआय’विरुद्ध खणखणीत शतक, दिले 208 रन्सचे टार्गेट
चेन्नई सुपर किंग्जची गोलंदाजी
चेन्नई सुपर किंग्जकडून पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली. फिरकीपटू अकील हुसेनने दानीश मालेवार आणि नमन धीर अशा महत्वाच्या खेळाडूंची विकेट पटकावली. त्यानंतर मुकुल चौधरीने दु:खात असताना देखील आपले गोलंदाजी करण्याचे कर्तव्य अचूक बजावले. त्याने क्विंटन डी कॉकची विकेट पटकावली. चेन्नईच्या गोलंदाजांनी आजच्या सामन्यात अत्यंत भेदक गोलंदाजी केली. नूर अहमद आणि अकील हुसेनने मुंबईचे कंबरडे मोडले. अंशूल कंबोजने ठाकूरची विकेट घेतली.
चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी
पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शतकी खेळी करणारा संजू सॅमसन खेळण्यासाठी आले. दोघांनी चांगली सुरुवात केली. ऋतुराज गायकवाडला आज फॉर्म सापडला असे वाटत असतानाच त्याने आपली विकेट गमावली. ऋतुराज 14 चेंडूत 22 रन्स करून आउट झाला. संजू सॅमसनने एका बाजूने चेन्नईची बाजू सांभाळून धरली. त्याने शानदार शतक करत 101 रन्स केल्या.
Giving no time to breathe 😅 Akeal Hosein and Mukesh Choudhary 🤝@ChennaiIPL on a roll💛 Updates ▶️ https://t.co/gGt34dqUoq#TATAIPL | #KhelBindaas | #MIvCSK pic.twitter.com/m1TKbngbUh — IndianPremierLeague (@IPL) April 23, 2026
ऋतुराज गायकवाड आउट झाल्यावर सरफराज खान मैदानात खेळण्यासाठी आला. पॉवर प्लेमध्ये संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि सरफराज खानने 73 रन्स केल्या. सरफराज खान आक्रमक खेळी करत होता. मात्र मिशेल सॅंटनरने त्याला आउट केले. सरफराजने 14 रन्स केल्या. त्यानंतर शिवम दुबे देखील केवळ 5 रन्स करून आउट झाला. डेवाल्ड ब्रेव्हिस 21 रन्स करून आउट झाला. जसप्रीत बुमराहने कार्तिक शर्माची विकेट घेतली.
मुंबई इंडियन्सची गोलंदाजी
मुंबई इंडियन्सकडून पहिली ओव्हर जसप्रीत बुमराहने टाकली. त्याने त्यामध्ये एक नो बॉल देखील टाकला. दुसरी ओव्हर स्वतः कर्णधार हार्दिक पंड्याने टाकली. मात्र मुंबईकडून दुसऱ्या ओव्हरमध्ये हार्दिकने देखील नो बॉल टाकला. त्यामुळे मुंबईची गोलंदाजी थोडीशी भरकटल्यासारखी दिसून येत होती. मिशेल सॅंटनरने सरफराज खानची विकेट घेतली. गजनफरने ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेला आउट केले. तर अश्वनी कुमारने ब्रेव्हिसची विकेट घेतली.
मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, दानिश मालेवार, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, ए.एम. गझनफर, जसप्रीत बुमराह, अश्वनी कुमार.
MI Vs CSK Live: संजूने हार्दिकला ‘पाणी पाजलं’! 12 चेंडूंमध्ये हार्दिकच्या अहंकाराचा उडवला धुव्वा
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य टीम: संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, डेवाल्ड ब्रेविस, सरफराज खान, शिवम दुबे, मॅथ्यू शॉर्ट / एम.एस. धोनी, जेमी ओव्हरटन, अंशुल कंबोज, नूर अहमद, गुरजपनेत सिंग, मुकेश चौधरी / मॅट हेन्री