
केकेआर अद्याप पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत
गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स येणार आमनेसामने
अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला
Tata IPL 2026 GT Vs KKR Live Updates: आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा महामुकाबला होणार आहे. गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स आमने सामने येणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होणार आहे. आजचा सामना केकेआरसाठी महत्वाचा असणार आहे. केकेआर पहिल्या (IPL 2026) विजयाच्या प्रतीक्षेत आहे. आजच्या सामन्याच्या खेळपट्टीबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
यंदाचा आयपीएल हंगाम अजूनही केकेआरसाठी चांगला झालेला नाही. कोलकाता नाइट रायडर्सला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे केकेआर पॉईंट्स टेबलला सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. दरम्यान 5 पैकी 5 सामने त्यांचा पराभव झालेला आहे.
पंजाब किंग्जविरुद्ध होणारा ईडन गार्डन्सवरील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी एक-एक गुण देण्यात आला होता. केकेआरला आजचा सामना काहीही करून जिंकणे आवश्यक असणार आहे. आयपीएलचा हंगाम जसा पुढे जात आहे, तसे केकेआरला आपली खेळीत सुधारणा करणे गरजेचे असणार आहे.
तर दुसरीकडे गुजरात टायटन्सचा संघ चांगली कामगिरी करत आहे. पहिले दोन सामन्यात गुजरात टायटन्सचा सणसणीत पराभव झाला होता मात्र त्यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरातने चांगली कामगिरी करत दोन्ही सामने जिंकले आहेत. गुजरात टायटन्सचा संघ सध्या पॉईंट्स टेबलमध्ये 6 व्या स्थानी आहे.
पिच रिपोर्ट
नरेंद्र मोदी स्टेडियमवर असणारी खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर समजली जाते. त्यामुळे या ठिकाणी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केल्यास विजयाची शक्यता जास्त निर्माण होते. या खेळपट्टीवर गोलंदाजांना देखील सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये मदत मिळू शकते. तसेच आज अहमदाबादमधील हवामान स्वच्छ आणि मोकळे राहण्याचा अंदाज आहे. तसेच या ठिकाणी पावसाची शक्यता देखील नाहीये. त्यामुळे आजचा सामना ठराविक वेळेत सुरू होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे.
GT Vs RR Pitch Report: टॉस ठरणार गेमचेंजर; पहिल्यांदा फलंदाजी केल्यास…; काय सांगतो पीच रिपोर्ट?
गुजरातच्या अहमदाबाद येथे असणारे नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये 1 लाख 32 हजार प्रेक्षक एका वेळेस सामना पाहू शकतात. या स्टेडियमला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे.