आयपीएल 2026 च्या पॉईंट्स टेबलमध्ये बदल (फोटो- सोशल मिडिया)
आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ
एसआरएच विरुद्ध केकेआर सामन्यानंतर झाले बदल
एसआरएचचा केकेआरवर 65 धावांनी विजय
Tata IPL 2026 Points Table Updates: गेल्या आठवड्यापासून आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. आयपीएलचा महासंग्राम सुरू होऊन जवळपास एक आठवडा पूर्ण होत आला आहे. आतापर्यंत 6 सामने या स्पर्धेत खेळले गेले आहेत. काल एसआरएच आणि केकेआर यांच्यात सामना पार पडला. यामध्ये केकेआरचा पराभव झाला. कालच्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये बदल झाले आहेत. त्याबाबत जाणून घेऊयात.
काल ईडन गार्डन्स स्टेडियमवर केकेआर विरुद्ध एसआरएच यांच्यात सामना झाला. कालच्या सामन्यात हैद्राबादच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. केकेआरला 227 धावांचे लक्ष्य दिले. हे आव्हान केकेआर पूर्ण करू शकली नाही. केकेआरचा 65 धावांनी पराभव झाला. त्यानंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत.
दोन पॉईंट्ससह सध्या राजस्थान रॉयल्स प्रथम स्थानी असल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या नंबरवर आरसीबीचा संघ आहे. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि 6 व्या स्थानी सनरायजर्स हैदराबादचा संघ आहे. तर आयपीएलमध्ये 4 संघांचे खाते अजूनही उघडलेले नाही. चेन्नई सुपर किंग्ज, लखनौचा संघ आणि केकेआर आणि गुजरात टायटन्सला विजयाचे खाते उघडता आलेले नाही. कोलकाताचा संघ सोडल्यास अन्य संघांनी अद्याप एकच सामना खेळला आहे.
CSK Vs PBKS Pitch Report: आजच्या सामन्यात टॉस करणार ‘गेम’; ‘हा’ निर्णय घेतल्यास विजय निश्चित
आजच्या सामन्यात टॉस करणार ‘गेम’
चेन्नई सुपर किंग्जने आपला पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध गमावला होता. तर पंजाब किंग्जच्या संघाने गुजरात टायटन्सविरुद्ध 3 विकेट्सने विजय मिळवला होता. तर आज चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. पंजाब किंग्जचा संघ आपला विजयाचा रथ कायम राखण्यासाठी उत्सुक असेल. तर चेन्नई आपल्या 1 ल्या विजयासाठी प्रयत्नशील असणार आहे.
16-16 ची बरोबरी कोण मोडणार? CSK Vs PBKS मध्ये तुंबळ लढाई; कोण मारणार बाजी?
एम. ए. चिदंबरम स्टेडियमचा पीच रिपोर्ट
एम. ए. चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. वेगवान गोलंदाजांसाठी खेळपट्टी मदतशीर नसल्याचे समोर आले आहे. मात्र फिरकीपटूंसाठी ही खेळपट्टी फायदेशीर ठरू शकते. मिडल ऑर्डरमध्ये फिरकीपटू चांगली कामगिरी करू शकतात. मात्र चेन्नईच्या स्टेडियमवर गेल्या काही सामन्यांमध्ये धावा जास्त झाल्या आहेत.






