Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 16.11.2026
Maharashtra to World Breaking News :
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून पुणे जिल्हा परिषद आणि भारत इतिहास संशोधक मंडळाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याने मध्यवर्ती भागात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून राजकीय हालचालींना वेग आला असून सुप्रिया सुळे यांच्या विधानानंतर पार्थ आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत महत्त्वाच्या बैठकीची शक्यता वर्तवली जात आहे. कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी असून आज, १६ नोव्हेंबरपासून नवी मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान थेट विमानसेवेचा शुभारंभ झाला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आगामी वर्ल्ड कपच्या १२ स्पर्धांच्या तारखा जाहीर केल्या असून ९ ऑक्टोबरपासून भारतात या प्रतिष्ठित स्पर्धेचा थरार रंगणार आहे. मानधन थकल्याने कंत्राटदाराने आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून ‘आपला दवाखाना’ला टाळे ठोकण्यात आले असून सर्वसामान्य रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.
16 Nov 2026 08:55 AM (IST)
राज्यात हवामानात सातत्याने बदल होत असून, गारठा वाढू लागला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, बंगालच्या खाडीत तयार झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळाच्या स्थितीत रूपांतरित झाला आहे. हे चक्रीवादळ प्रामुख्याने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार असले, तरी त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातही हवामानातील बदल आणि तापमानातील चढ-उतार पाहायला मिळणार आहेत. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे.






