PBKS vs GT Live Streaming (फोटो - ट्विटर)
गुजरातने पंजाबला दिले 163 धावांचे लक्ष्य
शुभमन गिल आणि बटलरने केले सर्वाधिक रन्स
पंजाबने पॉवर प्ले मध्ये केली चांगली सुरुवात
Tata IPL GT vs PBKS 2026 Live Updates: आज पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात चंदीगडमध्ये आयपीएलचा सामना पार पडला. पंजाब किंग्जने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला गुजरातच्या फलंदाजांनी संयमी खेळी करून धावा केल्या. मात्र शुभमन गिल आणि बटलर बाद झाल्यावर मोठी धावसंख्या उभारण्यात गुजरातचा संघ अपयशी ठरला. अखेर पंजाब किंग्ज संघाने गुजरात टायटन्सवर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे.
आयपीएलमध्ये पदार्पण केलेला आणि आपला पहिलाच सामना खेळणारया कूपर कॉनलीने 44 चेंडूत 72 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या 72 धावांच्या खेळीमुळेच पंजाबने गुजरातवर विजय मिळवला आहे. सुरुवातीला प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग मैदानात पंजाबकडून सलामीला खेळण्यासाठी उतरले. प्रभसिमरन 37 धावा करून बाद झाला. तर प्रियांश आर्या 7 धावा करून बाद झाला.
12 व्या ओव्हरनंतर गुजरातने प्रसिद्ध कृष्णाला चेंडू सोपवला. त्याने पंजाबच्या संघाला चांगलेच अडचणीत आणले. 163 धावांच्या विजयाचा अरमात पाठलाग करू शकेल असे वाटत असताना पंजाबचा संघ ढेपाळला. कर्णधार श्रेयस अय्यर देखील चांगली कहली करू शकला नाही. 18 धावा करून तो बाद झाला. शशांक सिंह, नेहाल वढेरा देखील स्वस्तात बाद झाले. कूपर कॉनलीने शेवटपर्यंत झुंज दिली आणि पंजाबला विजय मिळवून दिला.
The debutant seals it in style! 💪@PunjabKingsIPL clinch a thriller in New Chandigarh to get their campaign going with a win ❤️ Scorecard ▶️ https://t.co/75rCxTCOL1#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvGT pic.twitter.com/WqBQNjuvA1 — IndianPremierLeague (@IPL) March 31, 2026
गुजरात टायटन्सकडून मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा या वेगवान गोलंडजाणी गोलंदाजी केली. कागिसो रबाडा एक विकेट घेण्यास यशस्वी ठरला. अशोक शर्मा आणि राशिद खानने देखील प्रत्येकी एक – एक विकेट घेतली. तर गुजरात टायटन्सकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक टिन विकेट्स घेतल्या.
गुजरात टायटन्सची फलंदाजी कशी राहिली?
प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स ने 6 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. तर गुजरात टायटन्सने पंजाबला 163 धावांचे लक्ष्य दिले होते. डावाची सुरुवात करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. दोघांनी सावध फलंदाजी करत संघाला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून दिली.
GT vs PBKS: Gujrat चा खेळ संपला! Punjab चे ‘किंग्स’ 163 धावांचे आव्हान पेलणार का?
मात्र साई सुदर्शन 13 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि जॉस बटलरने डाव सांभाळला. कर्णधार शुभमन गिल39 धावांची खेळी करून बाद झाला. तर ग्लेन फिलिप्सने देखील 25 धावा करून संघाला आपले योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदरने 18 धावा केल्या. शाहरुख खान 4 धावा करून बाद झाला. राहुल तेवतिया आई राशीद खान हे नाबाद राहीले.
पंजाब किंग्सची संभाव्य टीम: प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टोइनिस, शशांक सिंग, अजमतुल्लाह ओमरजई, मार्को यान्सन, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, कूपर कानोली
GT Vs PBKS Pitch Report: टॉस ठरणार ‘बॉस’! खेळपट्टीचा काय नेम नाही अन्…; कोणाची धुलाई होणार?
गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जॉस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, शाहरुख खान, राशिद खान, प्रसिद्ध कृष्णा






