पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स (फोटो- ai gemini)
आज पंजाब विरुद्ध गुजरातमध्ये होणार सामना
चंदीगडमधील स्टेडियमवर येणार आमने सामने
शुभमन गिल विरुद्ध श्रेयस अय्यर खेळणार
Tata IPL 2026 Live: 28 मार्चपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू झाला आहे. आज युवा कर्णधार आमनेसामने येणार आहेत. आज चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्समध्ये सामना होणार आहे. गुजरात टायटन्सचे कर्णधार पद शुभमन गिलकडे आहे. तर पंजाब किंग्जचे कर्णधारपद हे श्रेयस अय्यरकडे आहे. तर आज होणाऱ्या सामन्यासाठी खेळपट्टीचा अंदाज कसा असणार आणि खेळपट्टी कोणाला साथ देणार हे पहावे लागणार आहे.
शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे आयपीएलच्या स्पर्धेतून ते स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतील. सलामीच्या सामन्यात दोन्ही संघ आज विजयासाठी या मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे चंदीगडच्या स्टेडियमवर पंजाब विरुद्ध गुजरात सामना रंगणार आहे.
महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या खेळपट्टीचा अंदाज
आज पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएलचा सामना पार पडणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी उत्सुक आहेत. दरम्यान या स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाज की फलंदाज यांच्यासाठी फायदेशीर असेल हे आपण जाणून घेऊयात.
महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे. सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना उपयुक्त ठरू शकते. या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यांमधील केवळ दोन ते तीन वेळेसच 200 धावांचा टप्पा पार झाला आहे. 160 ते 180 अशी धावसंख्या पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने येथे केली आहे. आज येथील हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे या ठिकाणी पावसाची शक्यता दिसून येत नाहीये.
CSK ला 15 वर्षांच्या पोराने रडवलं! ‘वैभव’ सूर्यवंशीचा गुवाहाटीत राडा; RR चा दणदणीत विजय
तसेच दुसऱ्या डावामध्ये खेळपट्टी आणि मैदानात दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही संघ या ठिकाणी टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याचा अंदाज जास्त प्रमाणात आहे. या स्टेडियम भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा शेवटचा सामना डिसेंबर महिन्यात झाला होता. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करतानाया दक्षिण आफ्रिकेने 200 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. भारतीय संघाला केवळ 162 धावा करता आल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी पंजा किंग्ज किंवा गुजरात टायटन्सचा संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल असे दिसून येत आहे.






