पंजाब किंग्सचा गुजरातविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय
शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या कामगिरीकडे लक्ष
चंदीगडच्या स्टेडियमचे पीच फलंदाजीसाठी उपयुक्त
GT vs PBKS Tata IPL 2026 Live Updates: सध्या चंदीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू आहे. दरम्यान पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निरी घेतला आहे. या स्टेडियमवरचे पीच फलंदाजीसाठी उपयुक्त असल्याचे समोर आले असताना देखील पंजाबने गोलंदाजी करण्याचा ठरवले. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स ने 6 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. तर गुजरात टायटन्सने पंजाबला 163 धावांचे लक्ष्य दिले आहे.
डावाची सुरुवात करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. दोघांनी सावध फलंदाजी करत संघाला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून दिली. मात्र साई सुदर्शन 13 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि जॉस बटलरने डाव सांभाळला. कर्णधार शुभमन गिल39 धावांची खेळी करून बाद झाला. तर ग्लेन फिलिप्सने देखील 25 धावा करून संघाला आपले योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदरने 18 धावा केल्या. शाहरुख खान 4 धावा करून बाद झाला. राहुल तेवतिया आई राशीद खान हे नाबाद राहीले.
PBKS vs GT Live: ‘टॉस’ची लढाई श्रेयस अय्यरने जिंकली; घेतलेला निर्णय Pitch Report च्या विरुद्ध?
पंजाबच्या गोलंदाजांनी पॉवर प्ले झाल्यानंतर गुजरातच्या फलंदाजीवर नियंत्रण ठेवल्याचे पाहायला मिळाले. अर्शदिप सिंगने 4 ओव्हर्समध्ये 42 धावा दिल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये अनेक वाईड बॉल आणि नो बॉल टाकले. विजयकुमार या गोलंदाजाने सर्वाधिक म्हणजेच 3 विकेट्स घेतल्या. तर यूझवेंद्र चहलने 2 विकेट्स घेतल्या.
दोन्ही संघ सध्या मजबूत स्थितीत पाहायला मिळत आहे. शुभमन गिलच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत शुभमन गिलला स्थान मिळाले नव्हते. तसेच श्रेयस अय्यरला देखील स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे दोघांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामध्ये कर्णधार शुभमन गिलने 38 धावा केल्याचे पाहायला मिळाले.
Innings Break! A strong comeback by the @PunjabKingsIPL bowlers to restrict @gujarat_titans to 1⃣6⃣2⃣/6 👏 Who will get the 𝗪 tonight? 🤔 Scorecard ▶️ https://t.co/75rCxTCOL1#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvGT pic.twitter.com/e16JTPoQCf — IndianPremierLeague (@IPL) March 31, 2026
पंजाब किंग्सची संभाव्य टीम: प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टोइनिस, शशांक सिंग, अजमतुल्लाह ओमरजई, मार्को यान्सन, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, कूपर कानोली
GT Vs PBKS Pitch Report: टॉस ठरणार ‘बॉस’! खेळपट्टीचा काय नेम नाही अन्…; कोणाची धुलाई होणार?
गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जॉस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, शाहरुख खान, राशिद खान, प्रसिद्ध कृष्णा






