
चेन्नईच्या संघाने लखनौला 188 रन्सचे टार्गेट
कार्तिक शर्माने केली 71 रन्सची शानदार खेळी
मिशेल मार्शने केली 90 रन्सची खेळी
Tata IPL 2026 CSK Vs LSG Live Updates: आज लखनौच्या एकाना स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना पार पडला. चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 187 रन्स केल्या. लखनौला (IPL 2026) जिंकण्यासाठी 188 रन्सचे टार्गेट चेन्नईने दिले होते. मिशेल मार्शने एलएसजीकडून तडाखेबंद खेळी केली. अखेर या सामन्यात एलएसजीने चेन्नई सुपर किंग्जचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. निकोलस पूरनने सलग 4 सिक्स मारून एलएसजीला विजय मिळवून दिला. चेन्नईचा पराभव झाल्याने प्ले ऑफची आशा मावळली आहे.
एलएसजीची फलंदाजी
चेन्नईने दिलेले 188 रन्सचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी लखनौच्या संघाकडून मिशेल मार्श आणि जोश इंग्लिश यांनी सुरूवात केली. या दोघांनी इतकी आक्रमक फलंदाजी केली की, 11 ओव्हर्समध्ये 129 रन्स पूर्ण केल्या. मिशेल मार्शने तडाखेबंद खेळी केली. दोघांनी 100 पेक्षा जास्त रन्सची नाबाद भागीदारी केली. मिशेल मार्श 90 तर जोश इंग्लिश 36 रन्स करून आउट झाला. त्यापाठोपाठ अब्दुल समद 7 रन्स करून आउट झाला.
चेन्नई सुपर किंग्जची गोलंदाजी
चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांना पहिल्या 11 ओव्हर्सपर्यंत एकही विकेट मिळवता आली नाही. अखेर मिशेल मार्शला रन आउट करण्यात चेन्नईल यश आले. मुकेश चौधरीने मार्शला रन आउट केले. तर जोश इंग्लिश 36 रन्सवर असताना मुकेश चौधरीने त्याला आउट केले. जॉनसनने समदची विकेट पटकावली.
Aussie duo on the charge 👊 Mitchell Marsh and Josh Inglis take #LSG to 39/0 after 4 overs 🤝 Updates ▶️ https://t.co/v1R8RJXPe8#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvCSK | @LucknowIPL pic.twitter.com/UBAe7oeWmo — IndianPremierLeague (@IPL) May 15, 2026
चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी
लखनौने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर चेन्नई सुपर किंग्जकडून संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड मैदानात खेळण्यासाठी उतरले. पहिले काही ओव्हर त्यांनी जम बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात ते अपयशी ठरले. कर्णधार ऋतुराज गायकवाड 13 आणि जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला संजू सॅमसन 20 रन्स करून आउट झाला. मागील सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा उर्वील पटेल आणि ब्रेव्हीसने चेन्नईचा डाव सांभाळला. कार्तिक शर्माने चेन्नईचा अडचणीत असलेला डाव सांभाळला. त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली. तो 71 रन्स करून आउट झाला. तसेच ब्रेव्हीस 25 रन्स करून आउट झाला. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये शिवम दुबेने 32 रन्सची खेळी केली आहे.
एलएसजीची गोलंदाजी
लखनौच्या गोलंदाजांनी चेन्नई सुपर किंग्जला सुरुवातीला तीन मोठे धक्के दिले. पहिलाच सामना खेळणारया आकाश महाराज सिंगने तीन महत्वाच्या विकेट घेतल्या त्याने उर्वील पटेल, कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसनची विकेट पटकावली. मोहम्मद शामीने ब्रेव्हीसची विकेट पटकावली. तर शाहबाज अहमदने आक्रमक खेळी करत असलेल्या कार्तिक शर्माला आउट केले.
LSG संभाव्य प्लेइंग ११-
जोश इंग्लिस, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), एडन मार्करम, अक्षत रघुवंशी, शाहबाज अहमद, हिम्मत सिंग, मोहम्मद शमी, आवेश खान, प्रिन्स यादव, मोहसीन खान.
CSK Vs LSG Live: कार्तिक शर्माने धू-धू धुतले; लखनौच्या संघाला विजयासाठी 188 रन्सचे टार्गेट
CSK संभाव्य प्लेइंग ११-
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, प्रशांत वीर, अकील हुसेन, अंशुल कंबोज, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, मुकेश चौधरी.