ऋतुराज गायकवाडचा नव्या रेकॉर्ड (फोटो- ians)
सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडचा नवा विक्रम
कर्णधार म्हणून पूर्ण केल्या एक हजार रन्स
सलग 31 व्या सामन्याचे नेतृत्व करतोय ऋतुराज
Tata IPL 2026 Ruturaj Gaikwad: एकाना स्टेडियमवर लखनौ विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना सुरू आहे. आयपीएलचा थरार सुरू आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा सन्मान कर्णधार ऋतुराज गायकवाडने वाढवला आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाडने आपल्या फलंदाजीने इतिहास रचला आहे. आपल्या आयपीएलच्या करियरमध्ये 31 डावांमध्ये 1000 रन्सचा टप्पा पार केला आहे. त्याने आपल्या नावावर एक महाविक्रम रचला आहे.
लखनौविरुद्ध खेळताना ऋतुराज गायकवाडने हा विक्रम केला आहे. आजचा सामना चेन्नई सुपर किंग्जसाठी सामना महत्वाचा आहे. आजचा 1 हजार रन्सचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 2 रन्सची गरज होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने हा विक्रम रचला आहे. लखनौकडून दुसरी ओव्हर आकाश सिंगने टाकली आहे.
ऋतुराज गायकवाडचा समावेश चेन्नईसाठी 1000 रन्स पूर्ण करणाऱ्या कर्णधारांमध्ये समावेश झाला आहे. ऋतुराज गायकवाडआधी महेंद्रसिंग धोनीने 1000 रन्स चेन्नईसाठी पूर्ण केल्या आहेत. ऋतुराज गायकवाडने 31 डावात कर्णधार म्हणून नेतृत्व केले आहे. कर्णधार असताना त्याने एक शतक आणि 8 अर्धशतक लगावले आहे.
ऋतुराज गायकवाडने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली असून चेन्नईचा दिग्गज खेळाडू सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांनाही मागे टाकले आहे. ऋतुराज गायकवाड हा आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद १००० रन्स पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी मुंबई इंडियन्सकडून खेळताना 31 डावांत 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.
कोण आहे आकाश महाराज सिंह?
IPL 2026 मध्ये, अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कौशल्याने आणि दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या यादीत आता एका नवीन नावाची भर पडली आहे ते म्हणजे आकाश महाराज सिंह. लखनौ सुपर जायंट्सच्या या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध एकापाठोपाठ एक बळी घेऊन खळबळ उडवून दिली. त्याने संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांसारख्या अत्यंत अनुभवी फलंदाजांनाही माघारी धाडले.
CSK Vs LSG Live: कार्तिक शर्माने धू-धू धुतले; लखनौच्या संघाला विजयासाठी 188 रन्सचे टार्गेट
आकाश सिंहने या हंगामात पहिल्यांदाच प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले. प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या लखनौ सुपर जायंट्सने सीएसकेविरुद्ध आकाशला संधी दिली आणि त्याने प्रभावित केले. आकाशने आपल्या चार षटकांत अत्यंत काटकसरीने गोलंदाजी करत केवळ २६ धावांत तीन बळी घेतले.






