
जसप्रीत बुमराहकडे मुंबईची धुरा
पलटणचा पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय
शार्दुल ठाकूरने घेतल्या 4 विकेट्स
Tata IPL 2026 MI Vs PBKS Live Updates: सध्या हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये सामना सुरू आहे. आज हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव (IPL 2026) उपस्थित नसल्याने जसप्रीत बुमराह मुंबईचे नेतृत्व करत आहे. 13 वर्षांनी पहिल्यांदाच बुमराहला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान आजच्या सामन्यात….
पंजाब किंग्जची फलंदाजी
मुंबई इंडियन्सने पंजाबला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. पंजाब किंग्जकडून प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य यांनी सुरूवात केली. प्रियांश आर्यने चांगली सुरुवात केली. मात्र तो 22 रन्स करून आउट झाला. त्यानंतर प्रभसिमरन सिंग आणि कूपर कॉनली यांनी पंजाबचा डाव सांभाळला. प्रभसिमरन सिंग 57 रन्सची अर्धशतकी खेळी करून आउट झाला.
हे काय घडलं! हार्दिक – सूर्या गायब, चक्क Jasprit Bumrah च्या खांद्यावर MI ची जबाबदारी
कूपर कॉनली 21 रन्स करून आउट झाला. कर्णधार श्रेयस अय्यर आज चांगली खेळी करू शकली नाही. श्रेयस अय्यरने ४ रन्स केल्या. सुयश शेडगेने 8 रन्सची खेळी केली. शशांक सिंगने तर जानसनने 2 रन्स केल्या. तर ओमरझाईने महत्वाच्या 38 रन्सची खेळी केली.
When life gives you lifeline, you smash a fifty! 💥 Prabhsimran Singh made the most of his luck tonight 👏 Updates ▶️ https://t.co/idtc2OTLbP#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvMI pic.twitter.com/yKno06W5i4 — IndianPremierLeague (@IPL) May 14, 2026
मुंबई इंडियन्सची गोलंदाजी
मुंबई इंडियन्सचे नेतृत्व आज जसप्रीत बुमराह करत आहे. मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या सलामीच्या जोडीला रोखण्याचे मुख्य आव्हान मुंबईसमोर होते. नमन धीरने 5 रन्सवर असताना प्रभसिमरनचा कॅच सोडला. मात्र दीपक चाहरने 22 रन्सवर खेळणाऱ्या प्रियांश आर्यला आउट केले. शार्दुल ठाकूरने 4 महत्वाच्या विकेट्स घेतल्या आहेत. राज बावाने देखील 1 विकेट घेतली.
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार),प्रियांश आर्य , हरनूर सिंग, प्रभसिमरन सिंग, मिचेल ओवेन, नेहल वढेरा, अजमतुल्लाह उमरजई, मार्को यानसन ,मुशीर खान. शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, सूर्यांश शेडगे,अर्शदीप सिंग, जेवियर बार्टलेट, युजवेंद्र चहल, लॉकी फर्ग्यूसन, हरप्रीत बराड़, विजयकुमार विशाक, यश ठाकुर, कूपर कोनोली, बेन ड्वार्शियस, पाइला अविनाश, विष्णू विनोद, प्रवीण दुबे, विशाल निषाद.
MI Vs PBKS Pitch Report: पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट
मुंबई इंडियन्स: हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, रयान रिकेल्टन, विल जॅक, कॉर्बिन बॉश, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, अश्विनी कुमार, जसप्रीत बुमराह, दीपक चाहर, मयंक मारकंडे, शार्दुल ठाकूर, क्विंटन डीकॉक, दानिश मालेवार, ए. एम. गझनफर, मयंक रावत, रघु शर्मा, मोहम्मद सलाउद्दीन इझहार.