MI Vs PBKS Pitch Report (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई इंडियन्स अन् पंजाब किंग्ज आमनेसामने
पंजाब किंग्जला सामना जिंकणे अनिवार्य
पराभवाचे उट्टे काढण्यासाठी पलटण सज्ज
Tata IPL 2026 MI Vs PBKS Live Updates: आयपीएलमध्ये आज एक रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी धडपड करणारी आणि प्लेऑफमधून बाहेर पडलेले संघ आज भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स (IPL 2026) विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये सामना होणार आहे. आजचा सामना हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा येथे होणार आहे. या सामन्याचा पीच रिपोर्ट जाणून घेऊयात.
आयपीएलचा 58 वा सामना धर्मशाळा येथे होत आहे. येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली समजली जाते. चेंडू थेट आणि सहजरीत्या बॅटवर येत असल्याने फलंदाजांना येथे चौकार-षटकारांची आतिषबाजी करणे सोपे जाते.येथे मोठे शॉट्स खेळणे अधिक सोपे जाते. खेळपट्टीला चांगली गती व उसळी प्राप्त होते. सुरुवातीला गोलंदाजांना तर काही ओव्हर्सनंतर फलंदाजांचे राज्य या ठिकाणी पहाय मिळेल. त्यामुळे आजच्या सामन्यात टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येणार आहेत. पहिल्यांदा वानखेडेवर झालेल्या सामन्यात पंजाबने मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी मुंबई पलटण सज्ज झाली आहे. मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडली आहे. पंजाब किंग्जने आपले सर्व सामने जिंकले तर त्यांना प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे आजचा सामना पंजाब साठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स नवव्या तर पंजाब किंग्ज सध्या चौथ्या स्थानावर आहे. मात्र टॉप 2 मध्ये जाण्यासाठी आणि टॉप 4 मध्ये राहण्यासाठी पंजाबला सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. त्यातच चांगल्या फरकाने जिंकल्यास रनरेटचा फायदा त्यांना मिळू शकतो.
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार),प्रियांश आर्य , हरनूर सिंग, प्रभसिमरन सिंग, मिचेल ओवेन, नेहल वढेरा, अजमतुल्लाह उमरजई, मार्को यानसन ,मुशीर खान. शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, सूर्यांश शेडगे,अर्शदीप सिंग, जेवियर बार्टलेट, युजवेंद्र चहल, लॉकी फर्ग्यूसन, हरप्रीत बराड़, विजयकुमार विशाक, यश ठाकुर, कूपर कोनोली, बेन ड्वार्शियस, पाइला अविनाश, विष्णू विनोद, प्रवीण दुबे, विशाल निषाद.
मुंबई इंडियन्स: हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, रयान रिकेल्टन, विल जॅक, कॉर्बिन बॉश, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, अश्विनी कुमार, जसप्रीत बुमराह, दीपक चाहर, मयंक मारकंडे, शार्दुल ठाकूर, क्विंटन डीकॉक, दानिश मालेवार, ए. एम. गझनफर, मयंक रावत, रघु शर्मा, मोहम्मद सलाउद्दीन इझहार.






