जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर जबाबदारी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणार आहे. १३ वर्षे मुंबई इंडियन्स फ्रँचायझीकडून खेळल्यानंतर, जसप्रीत बुमराहवर इतका मोठा विश्वास पहिल्यांदाच दाखवण्यात आला आहे. २०१३ मध्ये मुंबई इंडियन्समधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारा बुमराह कधीही दुसऱ्या संघाकडून खेळलेला नाही. त्याने या फ्रँचायझीसाठी १५६ सामने खेळले आहेत. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यानंतर तो चालू हंगामातील संघाचा तिसरा कर्णधार आहे.
मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर लिहिले:
“एका अनोख्या गोलंदाजी शैलीच्या मुलाने त्याला हवे तसे यॉर्कर टाकले. तोच मुलगा, जो आता खेळाचा एक महान खेळाडू आहे, धरमशाला येथे ब्लू अँड गोल्ड संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. कर्णधार जसप्रीत, हा एक गौरवशाली प्रवास आहे!”
जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकली
जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणारा सूर्यकुमार यादव आणि फिरकी गोलंदाज अल्लाह गझनफर हे या सामन्यासाठी मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नाहीत. पंजाबनेही झेवियर बार्टलेट आणि अझमतुल्ला उमरझाई यांच्यासह दोन बदल केले आहेत.
रोहित शर्माऐवजी बुमराहला कर्णधार म्हणून का निवडण्यात आले?
मुंबई इंडियन्सचे कर्णधार हार्दिक पांड्या आणि प्रभारी कर्णधार सूर्यकुमार यादव हे धरमशाला येथे पंजाब किंग्सविरुद्ध गुरुवारी रात्री होणाऱ्या सामन्यात खेळत नसल्यामुळे, कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे सोपवण्याची गरज निर्माण झाली. पाच वेळा आयपीएल जिंकलेला कर्णधार रोहित शर्मा मुंबईसाठी एक पर्याय असू शकला असता, परंतु अलीकडील सामन्यांमध्ये रोहित चांगला खेळला असला तरीही Substitute म्हणून राहिला आहे आणि त्याच्या हॅमस्ट्रिंगमुळे कदाचित त्याला खेळवले जात नसावे असा अंदाज प्रेक्षक लावत आहेत.
MI Vs PBKS Pitch Report: पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट
जसप्रीत बुमराहला भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे
जसप्रीत बुमराहने २०२४-२५ मध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तसेच, २०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातही त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. बीसीसीआयलाही त्याला पूर्णवेळ कर्णधार बनवायचे होते, परंतु कामाच्या ताणामुळे त्याने ही जबाबदारी नाकारली होती.
आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सची अवस्था
इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर पडले आहेत. संघाने ११ पैकी केवळ तीन सामने जिंकले असून आठ गमावले आहेत. मुंबईच्या खाली लखनौ सुपरजायंट्स आहेत, ज्यांच्या प्लेऑफच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत.






