Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 मध्ये आज घमासान! यशस्वी विरुद्ध कुलदीपमध्ये चुरशीची लढत, पहा Playing 11

अक्षर पटेलच्या दिल्लीसाठी आजचा सामना 'करा किंवा मरा' असा असणार आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी आणि आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी दिल्लीला आजचा सामना जिंकणे गरजेचच असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 01, 2026 | 11:20 AM
IPL 2026 मध्ये आज घमासान! यशस्वी विरुद्ध कुलदीपमध्ये चुरशीची लढत, पहा Playing 11
Follow Us
Close
Follow Us:

यशस्वी जयस्वाल विरुद्ध कुलदीप यादव रंगणार सामना 
जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर येणार आमनेसामने 
प्लेऑफमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांना सामना जिंके आवश्यक

Tata IPL 2026 Live Updates RR Vs DC: आज जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना होणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स चौथ्या तर दिल्ली कॅपिटल्स सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे दिल्लीसाठी आजचा सामना जिंकणे आवश्यक असणार आहे. आज आपण दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड आणि प्लेइंग 11 जाणून घेऊयात.

हेड-टू-हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात या दोन संघांमधील लढत नेहमीच चुरशीची ठरली आहे. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आतापर्यंत 30 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 15 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांचे पारडे समान असले तरी, जयपूरच्या मैदानावर राजस्थानचा रेकॉर्ड दिल्लीपेक्षा चांगला आहे. गेल्या हंगामात दिल्लीने राजस्थानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले होते. त्यामुळे राजस्थानला गफील राहून चालणार नाही.

DC Vs RR Pitch Report: दिल्ली विरुद्ध राजस्थान रंगणार सामना; टॉस जिंकून पहिल्यांदा…, पहा पीच रिपोर्ट

अक्षर पटेलच्या दिल्लीसाठी आजचा सामना ‘करा किंवा मरा’ असा असणार आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी आणि आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी दिल्लीला आजचा सामना जिंकणे गरजेचच असणार आहे. आतापर्यंत दिल्ली केवळ 3 सामने जिंकली आहे. गेल्या तीन सामन्यांतील पराभवाची मालिका खंडित करून पुनरागमन करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

कशी असेल आजची खेळपट्टी?

आजचा दिल्ली विरुद्ध राजस्थानचा सामना जयपूरमध्ये होत आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. जयपूरची खेळपट्टी ही फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी चांगली समजली जाते. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये नवीन बॉल असेल तर स्विग मिळू शकतो. दुसऱ्या डावात गोलंदाज प्रभावी मारा करू शकतात.

मॅच सुरू झाल्यावर काही ओव्हर्सनंतर  खेळपट्टी थोडी संथ होऊ शकते, ज्यामुळे मधल्या ओव्हर्समध्ये कुलदीप यादव यांसारख्या फिरकीपटूंना मदत मिळेल. खेळपट्टीवर फलंदाज स्थिरावला की, येथे मोठे फटके मारणे सोपे जाते. आउटफील्ड वेगवान असल्याने चेंडू सीमारेषेपलीकडे लवकर पोहोचतो.

GT Vs RCB Live: गुजरातने काढला पराभवाचा वचपा; ‘टायटन्स’ने आरसीबीला केले चारीमुंड्या चीत

राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम:  वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, रविंद्र जडेजा, दसुन शनाका, नांद्रे बर्गर, यश राज पुंजा, ब्रिजेश शर्मा

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: साहिल पारख, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), मिचेल स्टार्क / दुष्मंथा चमीरा, काइल जेमीसन, कुलदीप यादव, टी. नटराजन

Web Title: Tata ipl 2026 rr vs dc playing 11 and head to head records jaiswal vs kuldeep yadav sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Delhi Capitals
  • IPL 2026
  • Rajasthan Royals

संबंधित बातम्या

DC Vs RR Pitch Report: दिल्ली विरुद्ध राजस्थान रंगणार सामना; टॉस जिंकून पहिल्यांदा…, पहा पीच रिपोर्ट
1

DC Vs RR Pitch Report: दिल्ली विरुद्ध राजस्थान रंगणार सामना; टॉस जिंकून पहिल्यांदा…, पहा पीच रिपोर्ट

GT Vs RCB Live: गुजरातने काढला पराभवाचा वचपा; ‘टायटन्स’ने आरसीबीला केले चारीमुंड्या चीत
2

GT Vs RCB Live: गुजरातने काढला पराभवाचा वचपा; ‘टायटन्स’ने आरसीबीला केले चारीमुंड्या चीत

RCB Vs GT Live: गुजरातपुढे ‘विराट’ सेना हतबल; आरसीबीने टायटन्सला दिले केवळ ‘इतक्या’ रन्सचे टार्गेट
3

RCB Vs GT Live: गुजरातपुढे ‘विराट’ सेना हतबल; आरसीबीने टायटन्सला दिले केवळ ‘इतक्या’ रन्सचे टार्गेट

IPL 2026: नेमका घोळ काय? अंगकृष रघुवंशी आउट की नॉट आउट? MCC ने दिले ‘हे’ स्पष्टीकरण
4

IPL 2026: नेमका घोळ काय? अंगकृष रघुवंशी आउट की नॉट आउट? MCC ने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.