GT VS RCB Live Streaming (फोटो- ट्विटर)
आरसीबीचा डाव 155 रन्सवर गडगडला
विराट कोहलीने केली 28 रन्सची आक्रमक खेळी
गुजरातने घेतला पराभवाचा बदला
Tata IPL 2026 GT Vs RCB Live Updates: आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये सामना झाला. आयपीएलचा 42 वा सामना अत्यंत रोमांचक अशा स्थितीमध्ये चाहत्यांना अनुभवायला मिळाला. गुजरातने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने (IPL 2026) प्रथम फलंदाजी करताना 155 रन्स केल्या. अखेर आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीवर विकेट्सने विजय मिळवला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबी दुसऱ्या स्थानी तर गुजरात टायटन्स पाचव्या स्थानावर पोहोचली आहे.
गुजरात टायटन्सची फलंदाजी
आरसीबीने प्रथम फलंदाजी करून गुजरातला 156 रन्सचे टार्गेट दिले होते. या रन्सचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल सलामीची जोडी मैदानात खेळण्यासाठी आले. मागील काही सामन्यात मोठी खेळी करणारा साई सुदर्शन केवळ 5 रन्स करून आउट झाला.
त्यानंतर कर्णधार शुभमन गिलने गुजरातची कमान आपल्या हातात घेतली. शुभमन गिलने 43 रन्सची खेळी केली. 43 रन्स करून तो आउट झाला. जोस बटलरने 39 रन्स केल्या. बटलर आउट झाल्यावर शाहरुख खानसुद्धा 8 रन्स करून आउट झाला. जेसन होल्डरसुद्धा 12 रन्स करून आउट झाला. राहुल तेवतीया आणि राशिद खानने जोरदार प्रहार करत गुजरातला विजय मिळवून दिला.
RCB Vs GT Live: गुजरातपुढे ‘विराट’ सेना हतबल; आरसीबीने टायटन्सला दिले केवळ ‘इतक्या’ रन्सचे टार्गेट
आरसीबीची गोलंदाजी
आरसीबीच्या गोलंदाजांनी गुजरातच्या आक्रमक खेळी करणाऱ्या फलांदाजांना लवकर माघारी पाठवले. भुवनेश्वर कुमारने 3 महत्वाच्या विकेट्स पटकावल्या. भुवनेश्वर कुमारने साई सुदर्शन, शुभमन गिल, जोस बटलरची विकेट घेतली. रोमारीओ शेफर्डने वॉशिंग्टन सुंदर आणि शाहरुख खानची विकेट घेतली. सुयश शर्माने जेसन होल्डरची विकेट घेतली.
आरसीबीची फलंदाजी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या डावाची सुरुवात करण्यासाठी जॅकब बेथल आणि विराट कोहली मैदानात उतरले होते. विराट कोहलीने आक्रमक खेळी करत बंगलोरला धमाकेदार सुरुवात करून दिली. जॅकब बेथल 5 रन्स करून आउट झाला. विराट कोहलीने 28 रन्सची खेळी केली. देवदत्त पाडीकलने 28 रन्सची खेळी केली. कर्णधार रजत पाटीदारने केवळ 19 रन्सची खेळी केली. जितेश शर्मा फक्त 1 रन्स करून आउट झाला. टीम डेव्हिड केवळ 9 आणि कृणाल पंड्याने 4 रन्स करून आउट झाले. शेफर्ड आक्रमक आणि मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. मात्र तो देखील आरसीबीला चांगली धावसंख्या उभी करून देऊ शकला नाही. तो 17 रन्स करून आउट झाला.
He can’t stop taking wickets 🔥🔥 Bhuvneshwar Kumar with a breathtaking spell of 3/28 🤩 Updates ▶️ https://t.co/I5Hg8ybefh#TATAIPL | #KhelBindaas | #GTvRCB pic.twitter.com/GjaTWAF0ZK — IndianPremierLeague (@IPL) April 30, 2026
गुजरात टायटन्सची गोलंदाजी
कागिसो रबाडाने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 रन्स दिल्या. त्यानंतर आलेल्या मोहम्मद सिराजने जॅकब बेथलlआया 5 रन्सवर आउट केले. त्याकहा कॅच राशिद खानने पकडला. कागिसो रबाडाने विराट कोहलीची विकेट घेतली. जेसन होल्डरने जितेश शर्माची विकेट घेतली. अर्शद खानने कृणाल पंड्याची आणि रजत पाटीदारची विकेट पटकावली. राशिद खानने टीम डेव्हिडची विकेट पटकावली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, जॅकब बेथेल , देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हॅझलवूड, रसिक सलाम डार , सुयश शर्मा.
RCB Vs GT Toss Live: ‘प्रिन्स’ गिलने जिंकला टॉस; आरसीबीविरुद्ध घेतला ‘हा’ निर्णय
गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, जेसन होल्डर, राशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.






