
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद येणार आमनेसामने
अहमदाबादच्या स्टेडियम होणार महामुकाबला
प्ले ऑफच्या शर्यतीत वाढली चुरस
Tata IPL 2026 GT Vs SRH Live: थोड्याच वेळात अहमदाबादच्या म्हणजेच जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैद्राबादचा संघ आमनेसामने येणार आहे. दोन्ही (IPL 2026) संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. प्ले ऑफमध्ये आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी आजचा सामना जिंकणे दोन्ही संघाना अनिवार्य असेल. दरम्यान एसआरएचने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
31 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. सध्या गुजरात टायटन्स दुसऱ्या आणि एसआरएचचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच दोघांचे गुण देखील सारखे आहेत. त्यामुळे आज जो संघ सामना जिंकणेल त्याचे प्ले ऑफमध्ये जाण्याचे स्वप्न अधिक प्रबळ झाल्याचे दिसून येईल. गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिल तर एसआरएचचे नेतृत्व पॅट कमिन्स करत आहे.
अश्लीलतेचा कळस! भर मॅचमध्ये ‘तो’ इशारा करणे Tim David ला पडले महागात; पहा Viral Video
गुजरात टायटन्सकडून राशिद खान, मोहम्मद सिराज, कगीसो रबाडा, साई सुदर्शन, शुभमन गिल, राहुल तेवतिया हे खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. तर एसआरएचकडून इशान किशन, पॅट कमिन्स, ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा हे खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहेत. त्यामुळे आजचा सामना हायस्कोअरिंग होण्याची शक्यता आहे.
काय असणार आजचा पीच रिपोर्ट?
थोड्याच वेळात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध एसआरएचमध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघाचे 14 पॉईंट्स झाले आहेत. अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. या खेळपट्टीवर फलंदाजांना फटके मारणे सोपे जाते. सुरुवातीच्या काही ओव्हर्स टिकून खेळल्यास येथे मोठा स्कोअर होण्याची शक्यता असते. संध्याकाळी या ठिकाणी दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात बॉल ओला झाल्यास गोलंदाजी करणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे आज जो संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता अधिक आहे.
GT Vs SRH Pitch Report: आज ‘महायुद्ध’ होणार! जो जिंकेल तो थेट…; पहा आजचा पीच रिपोर्ट
गुजरात टायटन्स संभाव्य प्लेइंग 11: साई सुदर्शन, शुभमन गिल, जोस बटलर, वाशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, निशांत सिंधू , राहुल तेवातिया, राशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुतार.
सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग 11: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स, शिवांग कुमार, ईशान मलिंगा, साकिब हुसेन, हर्ष दुबे