GT VS SRH Pitch Report (फोटो- सोशल मिडिया)
आयपीएलचा महासंग्राम पोहोचला थरारक स्थितीत |
आज गुजरात अन् एसआरएच येणार आमनेसामने
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार सामना
GT Vs SRH Tata IPL 2026 Live Updates: आज चाहत्यांना एक रोमांचक आणि मोठ्या धावसंख्येचा सामना पाहायला मिळणार आहे. कारण आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनराययझर्स हैद्राबादमध्ये (IPL 2026) सामना होणार आहे. दोन्ही संघ सध्या टॉप 4 मध्ये आहेत. त्यामुळे आजचा विजय मिळवून आपले स्थान अधिक भक्कम करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. आजच्या सामन्याचा पीच रिपोर्ट जाणून घेऊयात.
सध्या गुजरात टायटन्सचा संघ तिसऱ्या आणि एसआरएचचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्यासाठी आजचा विजय दोन्ही संघाना महत्वाचा असणार आहे. शुभमन गिल गुजरात टायटन्सचे तर पॅट कमिन्स एसआरएचचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे आज अहमदाबादच्या स्टेडियमवर कोणता संघ जिंकणार हे पहावे लागणार आहे.
काय असणार आजचा पीच रिपोर्ट?
थोड्याच वेळात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध एसआरएचमध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघाचे 14 पॉईंट्स झाले आहेत. अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. या खेळपट्टीवर फलंदाजांना फटके मारणे सोपे जाते. सुरुवातीच्या काही ओव्हर्स टिकून खेळल्यास येथे मोठा स्कोअर होण्याची शक्यता असते.
सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये नवीन बॉल स्विंग होऊ शकतो. पॅट कमिन्स किंवा गुजरातचे वेगवान गोलंदाज अचूक टप्प्यावर मारा करून सुरुवातीला फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. जसजसा सामना पुढे जाईल, तशी खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक सोपी होऊ शकते.संध्याकाळी या ठिकाणी दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात बॉल ओला झाल्यास गोलंदाजी करणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे आज जो संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता अधिक आहे.
DC Vs PBKS Live: पंजाबच्या ‘किंग्ज’चा पराभवाचा ‘चौकार’; दिल्लीच्या विजयाने Play Off चे गणित बिघडले
गुजरात टायटन्स संभाव्य प्लेइंग 11: साई सुदर्शन, शुभमन गिल, जोस बटलर, वाशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, निशांत सिंधू , राहुल तेवातिया, राशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुतार.
सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग 11: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स, शिवांग कुमार, ईशान मलिंगा, साकिब हुसेन, हर्ष दुबे






