Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH Vs MI Live: मुंबईची ‘पलटण’ गार! ट्रेविस हेडने संपवलं मुंबईचं IPL मधील आव्हान

हेड आणि अभिषेकच्या जोडीने पॉवर प्लेमध्ये मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली आहे. 7 ओव्हर्समध्येच एसआरएचने 110 पेक्षा जास्त रन्सची पहिल्या विकेटसाठी भागीदारी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 29, 2026 | 11:40 PM
SRH Vs MI Live: मुंबईची ‘पलटण’ गार! ट्रेविस हेडने संपवलं मुंबईचं IPL मधील आव्हान
Follow Us
Close
Follow Us:

रियान रिकल्टनने लगावले शानदार शतक 
हेड-शर्माने पॉवर प्लेमध्ये केली मुंबईची धुलाई
ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माची 129 रन्सची भागीदारी 

Tata IPL 2026 MI Vs SRH Live Updates: आज मुंबई इंडियन्सच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमध्ये सामना पार पडला. मुंबई इंडियन्सने टॉस (MI Vs SRH) जिंकून प्रथम फलंदाजी केली. मुंबई इंडियन्सने एसआरएचला 244 रन्सचे टार्गेट दिले होते. एसआरएच कडून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी जबरदस्त सुरुवात केली. अखेर या सामन्यात एसआरएचने मुंबई इंडियन्सचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामातील 6 वा पराभव झाला आहे. आयपीएल 2026 मधील मुंबई इंडियन्सचे आव्हान जवळपास संपूष्टात आले आहे.

एसआरएचची फलंदाजी

मुंबई इंडियन्सने दिलेल्या 244 रन्सचा पाठलाग करण्यासाठी एसआरएचकडून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा सलामीची जोडी म्हणून मैदानात खेळण्यासाठी आली. हेड आणि अभिषेकच्या जोडीने पॉवर प्लेमध्ये मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली आहे. 7 ओव्हर्समध्येच एसआरएचने 110 पेक्षा जास्त रन्सची पहिल्या विकेटसाठी भागीदारी केली. 129 रन्सवर एसआरएचने पहिली विकेट गमावली. त्यापाठोपाठ आलेला इशान किशन देखील शून्यावर आउट झाला. अभिषेक शर्माने 45 रन्स केल्या.

First FIFTY of the season, and he brings it up in 2️⃣1️⃣ deliveries 👏 Travis Head for a reason 🫡 Updates ▶️ https://t.co/ypWTkEr2Rc#TATAIPL | #KhelBindaas | #MIvSRH pic.twitter.com/KZExTEARY3 — IndianPremierLeague (@IPL) April 29, 2026

आक्रमक खेळी करत असलेल्या ट्रेविस हेडने 30 बॉलमध्ये 76 रन्स केल्या. 76 रन्स करून तो आउट झाला. लागोपाठ दोन विकेट गेल्यानंतर मुंबईच्या आशा वाढल्या होत्या. मात्र नितीश कुमार रेड्डी आणि हेनरी क्लासेन यांनो पलटणच्या हातातून सामना हिसकावून नेला. नितीश कुमार रेड्डी 21 रन्स करून आउट झाला.

मुंबई इंडियन्सची गोलंदाजी 

पॉवर प्लेमध्ये जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि अन्य महत्वाच्या गोलंदाजांना एसआरएचच्या फलंदाजांनी धुलाई केली. मात्र ए.एम. गझनफरने अभिषेक शर्मा आणि ईशान किशनची विकेट पटकावली. त्यामुळे मुंबईच्या संघात विजयाचा आत्मविश्वास निर्माण झाला होता. ट्रेंट बोल्टने मोक्याच्या क्षणी नितीश कुमार रेड्डीची विकेट घेऊन विजयाच्या आशा पल्लवित केल्या.
MI Vs SRH Live: मुंबईचा नवा ‘सिंघम’! रिकल्टनची मलई अन् ‘एसआरएच’ची धुलाई, हैदराबादला 244 रन्सची गरज

मुंबई इंडियन्सची फलंदाजी

मुंबई इंडियन्सकडून डावाची सुरूवात करण्यासाठी रियान रिकल्टन आणि विल जॅक्स वानखेडे स्टेडियमवर खेळण्यासाठी आले. रियान रिकल्टन आणि विल जॅक्सने मुंबईच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. विल जॅक्सने 46 रन्सची तुफानी खेळी केली. विल जॅक्स मुंबई इंडियन्सकडून आज पहिलाच सामना खेळत आहे. तो 46 रन्स करून आउट झाला. रियान रिकल्टनने अर्धशतकी खेळी केली. सूर्यकुमार यादवने आज देखील निराशा केली. 5 बॉलमध्ये केवळ 5 रन्स करून सूर्यकुमार आउट झाला. त्यानंतर डच्चू देण्यात आलेल्या नमन धीर आणि रिकल्टनने मुंबईचा डाव सावरला. रियन रिकल्टनने तडाखेबंद शतक लगावले. नमन धीर 22 रन्स करून आउट झाला. नमन आउट होताच तिलक वर्मा ऐवजी स्वतः कर्णधार हार्दिक पंड्या खेळण्यासाठी उतरला. रियान रिकल्टनने आपले शतक पूर्ण करत मुंबईला मोठी धावसंख्या उभरण्यात मोठा वाटा उचलला. हार्दिक पंड्या 31 रन्स करून आउट झाला. तिलक वर्मा 7 रन्स आउट झाला.

एसआरएचची गोलंदाजी

पॅट कामिन्सच्या नेतृत्वात खेळण्यासाठी उतरलेल्या एसआरएचच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. नितीश कुमार रेड्डीने आक्रमक खेळी करत असलेल्या विल जॅक्सला आउट केले. तर एशान मलिंगाने सूर्यकुमार यादवला आउट केले. प्रफुल हिंगे ने जबरदस्त गोलंदाजी करत चांगली खेळी करत असलेल्या नमन धीरल आउट केले. साकीब हुसेनने पंड्याला आउट केले.

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, नमन धीर, दानिश मालेवार, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रोमारिओ शेफर्ड / केशव महाराज, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, मयंक मार्कंडे, क्विंटन डी कॉक.

MI Vs SRH Live: मुंबई पलटणचा पीच रिपोर्ट विरुद्ध निर्णय; टॉस जिंकून घेतला…

एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, ईशान कलिंगा, साकीब हुसेन, प्रफुल्ल हिंगे.

 

Web Title: Tata ipl 2026 travis head srh beat mumbai indians by 6 wickets sports updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 11:36 PM

Topics:  

  • IPL 2026
  • SRH vs MI
  • Travis Head

संबंधित बातम्या

MI Vs SRH Live: मुंबईचा नवा ‘सिंघम’! रिकल्टनची मलई अन् ‘एसआरएच’ची धुलाई, हैदराबादला 244 रन्सची गरज
1

MI Vs SRH Live: मुंबईचा नवा ‘सिंघम’! रिकल्टनची मलई अन् ‘एसआरएच’ची धुलाई, हैदराबादला 244 रन्सची गरज

MI Vs SRH Live: मुंबई पलटणचा पीच रिपोर्ट विरुद्ध निर्णय; टॉस जिंकून घेतला…
2

MI Vs SRH Live: मुंबई पलटणचा पीच रिपोर्ट विरुद्ध निर्णय; टॉस जिंकून घेतला…

IPL 2026 मध्ये पंजाबचा पहिला पराभव अन् Shreyas Iyer भडकला, कोणावर फोडले खापर?
3

IPL 2026 मध्ये पंजाबचा पहिला पराभव अन् Shreyas Iyer भडकला, कोणावर फोडले खापर?

‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती! ई-सिगारेट पिताना Riyan Parag चा Video Viral; नेटकऱ्यांनी झाप झापलं…
4

‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती! ई-सिगारेट पिताना Riyan Parag चा Video Viral; नेटकऱ्यांनी झाप झापलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.