
लखनौ सुपर जायंट्स अन् चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने
चेन्नई सुपर किंग्जसाठी सामना जिंकणे अनिवार्य
प्ले ऑफच्या शर्यतीतून लखनौ बाहेर
Tata IPL 2026 LSG Vs CSK Live Updates: थोड्याच वेळात लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स अन् चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने येणार आहोत. सध्या आयपीएलचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. लखनौचा संघ आधीच प्ले ऑफच्या बाहेर गेला आहे. मात्र चेन्नईच्या आशा अद्याप जिवंत आहेत. दरम्यान लखनौने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सात वाजता टॉस झाल्यावर भारतीय वेळेनुसार 7.30 वाजता सुरू होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड तर लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी सर्व संघ प्रयत्न करत आहेत. मुंबई इंडियन्स, केकेआर आणि लखनौचा संघ या स्पर्धेतून जवळपास बाहेर गेले आहेत. त्यामुळे उर्वरित संघ प्ले ऑफ साठी प्रयत्न करत आहेत.
चेन्नई सुपर किंग्जच्या संघाच्या आशा अजून जिवंत आहेत. चेन्नईला पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. तर त्यांना प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी मदत होऊ शकते. तसेच लखनौचा संघ स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्यामुळे आज दोन्ही संघ विजायसाठी मैदानात उतरताना दिसणार आहेत.
LSG vs CSK: लखनऊच्या मैदानावर गोलंदाज की फलंदाज कोण करणार कमाल? वाचा पिच रिपोर्ट
LSG vs CSK पिच रिपोर्ट
लखनऊ विरुद्ध चेन्नई सामना एकाना स्टेडियममधील पिच क्रमांक ४ वर खेळला जाईल. ही पिच लो स्कोअरिंग पिच आहे. म्हणजेच, ही पिच संथ आहे. ज्यामुळे फलंदाजांसाठी फलंदाजी करणे तितके सोपे असणार नाही. या पिचवर लखनऊने ११९, आणि १४१ धावा केल्या असून दोन्ही सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे. या पिचवर ३० पैकी २३ विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेतले आहेत. तर, फिरकी गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट वेगवान गोलंदाजांपेक्षा जास्त राहिला आहे त्यामुळे, दोन्ही संघ अतिरिक्त वेगवान गोलंदाज मैदानात उतरवू शकतात.
आयपीएलच्या इतिहासात एलएसजी LSG विरुद्ध सीएसके CSK यांच्यात एकूण सात सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन सामने जिंकले असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. यामुळे दोन्ही संघांमध्ये एक चुरशीची स्पर्धा होऊ शकते. परंतु, सध्याचा फॉर्म पाहता, चेन्नई सुपर किंग्सचे पारडे जड दिसत आहे.
तोंडचा घास पळवला! ‘त्या’ 9 बॉलमध्ये Tilak Varma ने श्रेयसला केले दु:खी; पंजाबवर अशक्यप्राय विजय
LSG संभाव्य प्लेइंग ११-
जोश इंग्लिस, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), एडन मार्करम, अक्षत रघुवंशी, शाहबाज अहमद, हिम्मत सिंग, मोहम्मद शमी, आवेश खान, प्रिन्स यादव, मोहसीन खान.
CSK संभाव्य प्लेइंग ११-
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, प्रशांत वीर, अकील हुसेन, अंशुल कंबोज, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, मुकेश चौधरी.