
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारतीय महिला संघाचे अनेक मालिका खेळवल्या जात आहेत, पुरुषांचा टी20 संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे तर भारताचा अ संघ हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. आगामी दिवसांमध्ये भारताचे खेळाडू हे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका देखील खेळताना दिसणार आहेत. दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. तिलक वर्मा यांची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर ऋतुराज गायकवाड यांची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
PM Narendra Modi यांनी विश्वविजेत्या भारतीय संघाची घेतली भेट! हरमनप्रीतने विचारला प्रश्न
दरम्यान, इशान किशन देखील भारत अ संघात परतला आहे. तो विकेटकीपिंग करताना दिसेल. टी-२० फलंदाज अभिषेक शर्माचाही संघात समावेश करण्यात आला आहे. तो डावाची सुरुवात करताना दिसू शकतो. तथापि, प्रभसिमरनलाही संधी देण्यात आली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळण्याची शक्यता कमी होती आणि नेमके तसेच घडले. त्यांना संघात निवडण्यात आले नाही. युवा खेळाडू मानव सुधार, निशांत सिंधू, विप्रज निगम आणि आयुष बदोनी यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे.
भारत अ संघ १३, १६ आणि १९ नोव्हेंबर रोजी राजकोटमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळेल. रोहित आणि विराट यांनी शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय मालिकेत भारताकडून खेळला होता, जिथे रोहित शर्माने अर्धशतक आणि एक शतक ठोकले होते, ज्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
India A’s squad for one-day team: Tilak Varma (C), Ruturaj Gaikwad (VC), Abhishek Sharma, Riyan Parag, Ishan Kishan (WK), Ayush Badoni, Nishant Sindhu, Vipraj Nigam, Manav Suthar, Harshit Rana, Arshdeep Singh, Prasidh Krishna, Khaleel Ahmed, Prabhsimran Singh (WK). — BCCI (@BCCI) November 5, 2025
रुतुराज गायकवाड याला मागील अनेक वर्षापासून भारतीय संघामधून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर तिलक वर्मा हा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी20 मालिकेमध्ये खेळताना दिसत आहे. या संघामध्ये अनेक नव्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. इशान किशनचे भारतीय संघामध्ये पुनरागमन झाले आहे.
टिळक वर्मा (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, रियान पराग, इशान किशन (यष्टीरक्षक), आयुष बडोनी, निशांत सिंधू, विपराज निगम, मानव सुथार, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसीद कृष्णा, खलील सिंग अहमद (विकेटकीपर)