India Vs England 4th T20: भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय; 15 धावांनी पराभव करत मालिका घातली खिशात
पुणे: भारत आणि इंग्लंड संघामध्ये सध्या पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरू आहे. त्यातील चौथा सामना हा पुणे येथे पार पडला. पुण्यातील गहूंजे स्टेडियमवर आजचा चौथा टी-20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा धावांनी पराभव केला. तसेच आजचा सामना जिंकून भारताने मालिका देखील आपल्या खिशात घातली आहे. भारताने प्रथम फलंदाजी केली. भारताने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 181 धावा केल्या. इंग्लंडला 182 धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंडने या धावांचा पाठलाग करताना 166 धावा केल्या. 166 धावांवर इंग्लंडचा खेळ आटोपला. 2012 पासून इंग्लंडने भारताविरुद्ध एकही टी-20 मालिका जिंकलेली नाही. हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 181 धावांवर मजल मारली.
4TH T20I. India Won by 15 Run(s) https://t.co/RmBLGBKcGd #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 31, 2025
भारताने प्रथम फलंदाजी करताना 181 धावा केल्या, सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये भारताची स्थिती नाजुक होती. मात्र हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी आक्रमक खेळी केली. इंग्लंडने पॉवरप्लेमध्ये जबरदस्त खेळी केली. बेन डकेट आणि फिलिप यांनी पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. मात्र भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत इंग्लंडला 166 धावांमध्ये रोखले. भारताचे 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 असे सामने जिंकत मालिका खिशात घातली आहे.
सेमीफायनलमध्ये टीम इंडिया लढणार इंग्लंडशी
आयसीसी U19 महिला T20 विश्वचषक 2025 सेमीफायनल : आयसीसी अंडर १९ महिला T२० विश्वचषक २०२५ आता शेवटच्या टप्प्यात आहेत. सध्या या विश्वचषकाचा पहिला सेमीफायनलचा सामान सुरु आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन महिला संघामध्ये लढत सुरु आहे. तर दुसरा सामना भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड यांच्यात रंगणार आहे. भारताच्या संघाने एकही सामना न गमावता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. पहिला सामना सकाळी ८ वाजता सुरु झाला आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सने पराभूत करून आयसीसी अंडर १९ महिला T२० विश्वचषक २०२५ च्या फायनलमध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. महिला अंडर-19 क्रिकेट यांच्यातील एक रोमांचक सामना क्वालालंपूरच्या बाय्युमास ओव्हलमध्ये खेळवला गेला. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये होते पण दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सेमीफायनलमध्ये बाजी मारली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल सामना कधी आणि कुठे पाहायचा
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये काही वेळातच ३१ जानेवारी रोजी सामना सुरु होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजता रंगणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील सामन्याचे आयोजन बाय्युमास ओव्हल, क्वालालंपूर येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनलचा सामान असणार आहे. पहिल्या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये जो संघ सेमीफायनल विजय मिळवेल तो संघ दक्षिण आफ्रिकेशी अंतिम सामना खेळेल.