फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
आयसीसी U19 महिला T20 विश्वचषक 2025 सेमीफायनल : आयसीसी अंडर १९ महिला T२० विश्वचषक २०२५ आता शेवटच्या टप्प्यात आहेत. सध्या या विश्वचषकाचा पहिला सेमीफायनलचा सामान सुरु आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन महिला संघामध्ये लढत सुरु आहे. तर दुसरा सामना भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड यांच्यात रंगणार आहे. भारताच्या संघाने एकही सामना न गमावता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. पहिला सामना सकाळी ८ वाजता सुरु झाला आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सने पराभूत करून आयसीसी अंडर १९ महिला T२० विश्वचषक २०२५ च्या फायनलमध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. महिला अंडर-19 क्रिकेट यांच्यातील एक रोमांचक सामना क्वालालंपूरच्या बाय्युमास ओव्हलमध्ये खेळवला गेला. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये होते पण दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सेमीफायनलमध्ये बाजी मारली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
Who’s booking a place in the #U19WorldCup 2025 Final? 🏆
How to watch ➡️ https://t.co/L2wtDy3GZm pic.twitter.com/IbrJxloFxo
— ICC (@ICC) January 31, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये काही वेळातच ३१ जानेवारी रोजी सामना सुरु होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजता रंगणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील सामन्याचे आयोजन बाय्युमास ओव्हल, क्वालालंपूर येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनलचा सामान असणार आहे. पहिल्या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये जो संघ सेमीफायनल विजय मिळवेल तो संघ दक्षिण आफ्रिकेशी अंतिम सामना खेळेल.
#U19WorldCup Semi Final Is Upon Us 🚨
🗓️ 31st January, 2025
🆚 England
⏰ 12:00 PM IST#TeamIndia | #INDvENG pic.twitter.com/PQEXfxWN8p— BCCI Women (@BCCIWomen) January 30, 2025
स्टार स्पोर्ट्स हे आयसीसी महिला अंडर-१९ T२० विश्वचषक २०२५ चे अधिकृत प्रसारक आहे. स्टार स्पोर्ट्स २ टीव्ही चॅनलवर चाहत्यांना हा सामना थेट पाहता येईल. ज्या दर्शकांना सामना ऑनलाइन बघायचा आहे ते डिस्ने+ हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर या सेमीफायनलच्या थेट प्रवाहाचा आनंद घेऊ शकतात. सामन्याचे संपूर्ण कव्हरेज आणि लाइव्ह अपडेट्स Disney+ Hotstar प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे, जेणेकरून चाहत्यांना कुठूनही सामन्याचा आनंद घेता येईल.
भारतीय संघाचे कर्णधारपद आयसीसी महिला अंडर-१९ T२० विश्वचषकात निकी प्रसादकडे सोपवण्यात आले आहे. मागील सामन्यांमध्ये भारताची फलंदाज त्रिशा गोंगाडी ही अंडर-१९ T२० विश्वचषकात शतक झळकावणारी पहिली फलंदाज ठरली.