Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीम इंडिया अंडर-19 विश्वचषकामध्ये २४ वर्षे कांगारूंविरुद्ध हरली नाही, नॉकआउट मॅचमध्ये १००% रेकॉर्ड

अंडर-19 विश्वचषकामध्ये २४ वर्षे कांगारूंविरुद्ध हरली नाही, नॉकआउट मॅचमध्ये १००% रेकॉर्ड. या विश्वचषकात भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण ७ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने ५ तर कांगारू संघाने दोन जिंकले आहेत.

  • By Payal Hargode
Updated On: Feb 02, 2022 | 10:24 AM
टीम इंडिया अंडर-19 विश्वचषकामध्ये २४ वर्षे कांगारूंविरुद्ध हरली नाही, नॉकआउट मॅचमध्ये १००% रेकॉर्ड
Follow Us
Close
Follow Us:

वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेला अंडर-19 विश्वचषक अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अँटिग्वा येथे होणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट चाहते खूप उत्सुक आहे. टीम इंडिया विजयासाठी फेव्हरेट मानली जात आहे.

उपांत्यपूर्व फेरीत भारताने एकतर्फी लढतीत बांगलादेशचा ५ गडी राखून पराभव केला, तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव करून अंतिम चारमध्ये स्थान पक्के केले.  पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाने ११९ धावांनी पराभव केला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४ वर्षे भारत हरला नाही

अंडर-19 विश्वचषकात भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण ७ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने ५ तर कांगारू संघाने दोन जिंकले आहेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या स्पर्धेत भारताने गेल्या २४ वर्षांपासून एकही सामना गमावलेला नाही. ऑस्ट्रेलियाने शेवटची वेळ १९९८ मध्ये भारताचा पराभव केला होता.

१९९८ नंतर या स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण ५ सामने खेळले गेले आणि भारतीय संघ सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. भारताने बाद फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण ३ सामने खेळले आणि सर्व जिंकले. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवूनच २०१२ आणि २०१८ अंडर-19 WC जिंकले. त्याचवेळी २००० च्या उपांत्य फेरीतही ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती.

दोन्ही संघ:

IND– यश धुल (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, हरनूर सिंग, राज बावा, कौशल तांबे, दिनेश बाना, निशांत सिंधू, विकी ओस्तवाल, राजवर्धन हंगरगेकर, वासू वत्स, रवी कुमार.

AUS– कूपर कॉनोली (कर्णधार), कॅम्पबेल केलावे, टीग वेली, एडन काहिल, कोरी मिलर, जॅक सेनफेल्ड, टोबियास स्नेल, विल्यम साल्झमन, जॅक निस्बेट, लचलान शॉ, टॉम व्हिटनी.

यंगिस्तान अप्रतिम फॉर्ममध्ये आहे

भारतीय संघाने चालू स्पर्धेत आतापर्यंत धडाकेबाज कामगिरी केली आहे. संघाने मालिका टप्प्यात 3 सामने खेळले आणि सर्व जिंकले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात संघाने बांगलादेशचे ५ गडी राखून पराभव केला. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत, ज्यात ३ जिंकले आहेत आणि एक संघाचा पराभव झाला आहे.

दोन वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानविरुद्ध त्याने ७१ चेंडूत ९७ धावा केल्या असून भारताला त्याच्या बॅटवर नियंत्रण ठेवावं लागणार आहे.

Web Title: Team india have not lost to kangaroos in under 19 world cup for 24 years 100 record in knockout matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2022 | 10:24 AM

Topics:  

  • Cricket World Cup
  • ICC U19 World Cup
  • IND VS AUS

संबंधित बातम्या

ICC U19 World Cup 2026 :15 जानेवारी पासून Under-19 World Cup चा रणसंग्राम! वाचा सामन्यांचे वेळापत्रक अन् भारतीय संघ…
1

ICC U19 World Cup 2026 :15 जानेवारी पासून Under-19 World Cup चा रणसंग्राम! वाचा सामन्यांचे वेळापत्रक अन् भारतीय संघ…

T20 World Cup 2026 पूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केली निवृत्तीची घोषणा, मार्चमध्ये खेळणार शेवटची मालिका
2

T20 World Cup 2026 पूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केली निवृत्तीची घोषणा, मार्चमध्ये खेळणार शेवटची मालिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.