फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारतीय क्रिकेट संघ : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या पाच सामान्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा फिवर सध्या क्रिकेट प्रेमींमध्ये सुरु आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना झाला आहे यामध्ये भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा त्याच्या घरच्या मैदानावर २९५ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताच्या संघाने आता मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताचा संघ रोहित शर्माच्या अनुपस्थित टीम इंडियाने पहिला सामना जिंकला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 6 ते 10 डिसेंबर दरम्यान ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 पासून खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील शानदार विजयानंतर भारतीय क्रिकेट संघ कॅनबेराला पोहोचला आहे. भारत अ संघाला शनिवारपासून कॅनबेरा येथील मनुका ओव्हल येथे ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय सराव सामना खेळायचा आहे.
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्यांच्या अधिकृत X हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ पर्थ ते कॅनबेरा असा प्रवास करताना दिसत आहे. कॅनबेरा येथे होणारा गुलाबी चेंडूचा सराव सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण ॲडलेडमध्ये होणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्यापूर्वी हा एकमेव सराव सामना असणार आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कर्णधार रोहित शर्माचा हा पहिलाच सामना असेल, कारण मुलाच्या जन्मामुळे तो पर्थमध्ये पहिली कसोटी खेळू शकला नाही.
Perth ✅#TeamIndia have arrived in Canberra! 🛬#AUSvIND pic.twitter.com/IhNtPmIOah
— BCCI (@BCCI) November 28, 2024
ॲडलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतणार आहे. कॅनबेरा येथे होणाऱ्या गुलाबी चेंडूच्या सराव सामन्यात केएल राहुलच्या फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दुखापतग्रस्त शुभमन गिल ॲडलेड कसोटीत खेळू शकला नाही, तर केएल राहुलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरवले जाऊ शकते. अशा स्थितीत देवदत्त पडिक्कलला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडावे लागेल. पर्थ कसोटीपूर्वी वाका मैदानावर झालेल्या सराव सामन्यात शुभमन गिलच्या अंगठ्याला दुखापत झाली होती.
शुभमन गिलने अद्याप नेटमध्ये फलंदाजीला सुरुवात केलेली नाही. जोपर्यंत शुभमन गिलला पुरेसा नेट सराव मिळत नाही तोपर्यंत त्याला धोका न देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेऊ शकते. शुभमन गिल तंदुरुस्त झाल्यास ध्रुव जुरेल आपोआप वगळला जाईल. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल सलामीवीर म्हणून आला होता. केएल राहुलने पहिल्या कसोटी सामन्यात 26 आणि 77 धावांची इनिंग खेळली होती. रोहित शर्माच्या एंट्रीने टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये मोठे बदल होणार आहेत. अशा स्थितीत टीम इंडियासाठी विजयाची घोडदौड कायम राखणे सर्वात महत्त्वाचे असेल.