फोटो सौजन्य – YouTube
U19 India vs England 2nd ODI Match Report : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये U19 संघामध्ये ODI मालिकेचा दुसरा सामना काल पार पडला. पहिल्या सामन्याच्या विजयानंतर दुसऱ्या सामन्यात भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात इंग्लडच्या संघाने भारतीय संघाचा १ विकेटने पराभव केला. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.
U19 भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या संघाने फलंदाजीचे आव्हान स्वीकारत पहिला डावामध्ये 290 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाने हे लक्ष 49.3 ओव्हरमध्ये पूर्ण केले. U19 भारत विरुद्ध इंग्लंड सामन्या बद्दल सांगायचे झाले तर टीम इंडियाचा कर्णधार आयुष मात्रे हा स्वस्तात बाद झाला तो एकही धाव करू शकला नाही.
आयपीएलचा स्टार वैभव सूर्यवंशी याने 45 धावांची खेळी खेळली तर विहान मल्होत्रा याने संघासाठी 49 धावा केल्या. टीम इंडियाने पहिला विकेट्स कमावल्यानंतर विहान मल्होत्रा आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनी चांगली भागीदारी केली होती पण ते संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाही. राहुल कुमार आणि कनिष चौहान त्या दोघांनीदेखील चांगली कामगिरी केली राहुल कुमार यांनी संघासाठी 47 धावा केल्या तर कनिश चौहान याने संघासाठी 45 धावा केल्या. भारताचा संघ फलंदाजी चांगली कामगिरी केली पण विजयासाठी या धावा पुरेशा नव्हत्या.
Vaibhav Suryavanshi was dismissed for 45 runs off 34 balls in the 2nd One-Day match against England U-19. In the first game, he had scored 48 runs off just 19 balls. 🙇🔥#Cricket #India #England #U19 pic.twitter.com/B0rZx6mUrp — Sportskeeda (@Sportskeeda) June 30, 2025
टीम इंडियाचा गोलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर भारताच्या संघाने नऊ विकेट्स घेतले. शेवटचा विकेट इंग्लंडचा भारताच्या हाती लागला नाही त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अंबरीश याने संघाला चार विकेट्स मिळवून दिले. त्याचबरोबर हेनील पटेल आणि युद्धजीत गुहा या दोघांनी संघाला प्रत्येकी दोन दोन विकेटची कमाई करून दिली तर कनिश चौहानच्या हाती एक विकेट लागला.