जसप्रीत बूमराह(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंडमधील दुसऱ्या कसोटीसाठी जसप्रीत बुमराह उपलब्ध असणार असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरी कसोटी २ जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये खेळली जाणार आहे. इंग्लंड संघाने आपला प्लेईंग ११ जाहीर केला आहे. आता बुमराहच्या कामगिरीबद्दल भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की “बुमराह अजूनही दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध आहे. बुमराहला या मालिकेतील पाचपैकी फक्त तीन सामने खेळायचे आहेत.”
टेन डोइशेट पुढे म्हणाले की, “बुमराह खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे. आम्ही आधीच नियोजन केले होते की तो पाचपैकी फक्त तीन कसोटी सामने खेळणार. शेवटच्या कसोटीनंतर त्याला बरे होण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी मिळाला होता, परंतु त्याची तंदुरुस्ती, कामाचा ताण आणि खेळपट्टीची स्थिती यासारख्या अनेक बाबी लक्षात घेऊन आम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे. तांत्रिकदृष्ट्या तो आता तंदुरुस्त आहे, परंतु तो दुसऱ्या कसोटीत खेळेल की नाही याबाबत मात्र आम्ही अद्याप ठरवलेले नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की, “हा निर्णय आम्ही या ४ सामन्यांचे व्यवस्थापन कसे करू शकतो यावर देखील अवलंबून असणार आहे. लॉर्ड्स, मँचेस्टर किंवा ओव्हर सामन्यांसाठी त्याला मागे ठेवायचे की नाही याबाबत आम्ही लक्ष ठेवत आहोत. त्याला ठेवणे चांगले होईल. तो पूर्णपणे तंदुरुस्त असून रविवारी सराव करत आहे आणि आज त्याने हलका सराव देखील केला आहे. यापूर्वी, मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले होते की बुमराहला दुसऱ्या कसोटीत विश्रांती देण्याची शक्यता आहे आणि तिसऱ्या कसोटीत तो परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत.
पहिल्या कसोटीत बुमराहने शानदार कामगिरी करून दाखवली आहे आणि भारतासाठी पहिल्या डावात पाच बळी टिपले आहेत. ज्यामुळे संघाला सहा धावांची थोडीशी आघाडी मिळाली होती. तथापि, दुसऱ्या डावात मात्र तो विकेट घेण्यास अपयशी ठरला. इंग्लंडने यह सामना पाच विकेटने जिंकला.
बुमराह पूर्ण पाच सामने खेळणार नाही
भारतीय संघ व्यवस्थापनाकडून आधीच स्पष्ट करण्यात आले होते. बुमराहला संपूर्ण पाच सामन्यांमध्ये खेळवण्यात येणार नाही, जेणेकरून त्याचा कामाचा ताण संतुलित ठेवता येईल. कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दोघांनी देखील याबाबत संकेत दिले होते की मालिकेतील परिस्थितीनुसार हा निर्णय घेण्यात जाईल.