पिंपरी चिंचवड करंडकावर ‘विन टेंपल’ने काेरले नाव (फोटो- सोशल मिडिया)
हिंजेवाडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर पहिल्यांदा खेळणाऱ्या बजरंग दल संघाचा डाव १८.२ षटकात ८३ धावांवर संपुष्टात आला. सुशांत कांबळे (२३ धावा) आणि ओंकार यादव (१३ धावा) यांनी थोड्याफार धावा केल्या. विन टेंपल संघाच्या हरी सावंत याने १६ धावांत तीन गडी बाद केले. वेरून चोदरी यानेसुध्दा १८ धावांत तीन गडी बाद केले. राकेश जे. आणि रोहीत चौधरी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून बजरंग दलाचा डाव झटपट गुंडाळला. हे लक्ष्य विन टेंपल क्लबने १२.४ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. हरी सावंत याने नाबाद ४३ धावांची खेळी केली. याशिवाय ललित मुसळे (१९ धावा) आणि विहान बागड (१४ धावा) यांनीही धावांचे योगदान देऊन संघाचे विजेतेपद निश्चित केले.
IND vs NZ : राहुलचे शतक पूर्ण; भारतीय संघाची धावसंख्या 260 च्या पार
स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्राचे रणजीपटू आणि एमसीएचे माजी सचिव रियाज बागवान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीसीसीएचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजू कोतवाल, खजिनदार संजय शिंदे, सहसचिव दिलीपसिंह मोहीतेपाटील, स्पर्धेचे संयोजक सुशील जाधव, मुकेश गुजराती, प्रशांत तेलंगे आदि उपस्थित होते. जगदीश शेट्टी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. राजू कोतवाल यांनी प्रास्ताविक तर, संजय शिंदे यांनी सुत्रसंचालन केले. मुकेश गुजराती यांनी सर्वांचे आभार मानले. विजेत्या विन टेंपल संघाला करंडक आणि २५ हजार रूपये, उपविजेत्या बजरंग दल संघाला करंडक आणि १५ हजार रूपये आणि तृतीय क्रमांकाच्या सह्यांद्री किंग्ज् संघाला करंडक आणि पाच हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.
बजरंग दलः १८.२ षटकात १० गडी बाद ८३ धावा (सुशांत कांबळे २३, ओंकार यादव १३, हरी सावंत ३-१६, वेरून चोदरी ३-१८, राकेश जे. २-३, रोहीत चौधरी २-१३) पराभूत वि. विन टेंपल क्लबः १२.४ षटकात ६ गडी बाद ८७ धावा (हरी सावंत नाबाद ४३ (३०, ५ चौकार, १ षटकार), ललित मुसळे १९, विहान बागड १४, गणेश कालेल ३-११); सामनावीरः हरी सावंत
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूः गणेश कालेल;
सर्वोत्कृष्ट फलंदाजः यश जाधव;
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः हरी सावंत;
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. पारस चव्हाण;
Ans: पिंपरी चिंचवड करंडक आंतरक्लब टी-20 क्रिकेट स्पर्धेत विन टेंपल क्लबने बजरंग दल संघाचा 4 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले.
Ans: हरी सावंतने अष्टपैलू कामगिरी करत गोलंदाजीत 16 धावांत 3 बळी घेतले, तर फलंदाजीत नाबाद 43 धावांची खेळी केली.






