मुंबई : कतार येथे सुरु असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेचा (FIFA World Cup 2022) आज समारोप होणार आहे. जगातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असलेली फिफा विश्वचषक स्पर्धा ही जगातील सर्वात श्रीमंत स्पर्धा देखील आहे. असे असताना ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळत असेल या विषयी सर्वांनाच उत्सुकता असते. आज रविवारी अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स (Argentina Vs France) या संघांमध्ये फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. या स्पर्धेत विजेता संघ जरी एक असला तरी उपविजेत्या ठरलेल्या तीन संघांवर देखील पैशांचा पाऊस पडणार आहे.
[read_also content=”आज फिफा विश्वचषक 2022 चा अंतिम मुकाबवला! अर्जेंटिना की फ्रान्स कोण होणार विश्वविजेता? https://www.navarashtra.com/sports/fifa-world-cup-2022-final-match-today-argentina-or-france-who-will-be-the-world-champion-354471.html”]
फुटबॉल विश्वचषक 2022 मधील एकूण प्राइज मनीचा आकडा ऐकून डोळे पांढरे होतील. बक्षिसापोटी फिफा विश्वचषकात संघांमध्ये 3568 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. फुटबॉल विश्वचषक 2022 जिंकणाऱ्या संघाला 344 कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघाला 245 कोटी रुपये इनामी रक्कम मिळणार आहे. फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्या नंबरवर राहणाऱ्या टीमला 219 कोटी रुपये आणि चौथ्या नंबरवरील टीमला 202 कोटी रुपये मिळतील. फीफा वर्ल्ड कपमधून पहिल्या राऊंडमधून बाहेर होणाऱ्या टीमना 72 कोटी रुपये मिळणार आहेत.